AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओच्या सबस्क्रायबरमध्ये झपाट्याने वाढ, वोडा-आयडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

जिओ येत्या महिन्यांमध्ये एक परवडणारा स्मार्टफोन लॉन्च करण्याचा विचार करीत आहे आणि यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा आहे. (The rapid increase in Jio's subscribers is likely to increase Voda-Idea's problems)

जिओच्या सबस्क्रायबरमध्ये झपाट्याने वाढ, वोडा-आयडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता
जिओच्या सबस्क्रायबरमध्ये झपाट्याने वाढ
| Updated on: May 06, 2021 | 5:54 PM
Share

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (RIL) मार्च तिमाहीची सबस्क्रायबरची आकडेवारी खूप चांगली आहे. त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन ती 15.2 दशलक्ष (152 लाख) झाली आहेत. शेवटच्या चार तिमाहीत ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. अर्थात डिसेंबर 2019 च्या दरवाढीच्या आधी सबस्क्रायबर 25 दशलक्षांच्या सरासरीपेक्षा खूपच कमी आहेत. तथापि, डिसेंबर, सप्टेंबर आणि जून तिमाहीत ही वाढ 5.2 दशलक्ष, 7.3 दशलक्ष आणि 10.8 दशलक्षपेक्षा जास्त आहे. (The rapid increase in Jio’s subscribers is likely to increase Voda-Idea’s problems)

जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड(Jefferies India Pvt Ltd)च्या विश्लेषकांनी म्हटले आहे की, शेतकरी चळवळीदरम्यान जिओला विरोध झाला असला तरी, त्याचे ग्राहकांच्या वाढत्या संख्येवरून असे दिसून येते की डिसेंबर आणि जानेवारीत होता तसा शेतकरी विरोधाचा प्रभाव पडत नाही. अंबिट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या विश्लेषकांनी सांगितले की, या तिमाहीत जवळपास 15 दशलक्षांची घसरण झाली आहे, जीओफोनसाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन योजनांचा हा एक परिणाम आहे. तथापि, याचा सबस्क्रायबरच्या बेस क्विलिटीवर निश्चितच परिणाम होतो.

वोडाफोन आयडियाला होऊ शकते नुकसान

मार्च तिमाहीमध्ये Jio च्या सबस्क्रायबरची वाढती संख्या पाहता मार्चच्या तिमाहिची आकडेवारी जाहीर करेल तेव्हा पीअर्स भारती एअरटेल लिमिटेड आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेड की कामगिरी करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जिओच्या नेट अ‍ॅडने गेल्या दोन तिमाहीत एअरटेलच्या शेअर्सना मागे टाकले आहे आणि पुढेही अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. Jio आणि Airtel दोन्हीही सबस्क्रायबर अॅडिशनच्या दृष्टीने चांगले काम करीत आहे. याचा अर्थ असा होतो की व्होडाफोन आयडियाचे मार्केट शेअर नुकसान होऊ शकते.

जिओ बजेट स्मार्टफोन लाँच करणार

याव्यतिरिक्त जिओ येत्या महिन्यांमध्ये एक परवडणारा स्मार्टफोन लॉन्च करण्याचा विचार करीत आहे आणि यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा आहे. क्रेडिट सुइस विश्लेषक म्हणाले की, आमचा विश्वास आहे की भारती एअरटेल हँडसेट ओईएम आणि वित्तपुरवठा करणार्‍या भागीदारांच्या सहकार्याने हँडसेट देखील बाजारात आणेल. एअरटेलची बॅलन्स शीट पाहता हे स्पष्ट होते की भारती एअरटेल परवडणारे स्मार्टफोन (टाय-अप) देखील लाँच करु शकते. (The rapid increase in Jio’s subscribers is likely to increase Voda-Idea’s problems)

इतर बातम्या

व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिका मिळाली नाही, कोरोनामुळे NSG ग्रुप कमांडरचा मृत्यू

इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार? उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.