AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कंपनीने सुरू केली रेल्वे तिकीट सेवा ‘रेडरेल’, आता मोबाईलवरून रिझर्व्हेशन करता येणार

जर तुम्हाला रेडबसच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेनचे तिकीट बुक करायचे असेल तर त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये रेडबसचे अॅप असणे आवश्यक आहे. अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांना अॅपच्या माध्यमातून बससोबतच रेल्वे प्रवासाचे तिकीटही बुक करता येणार आहे, असेही रेडबसने म्हटलेय. एकाच अॅपवर बस आणि ट्रेनचे तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध असेल.

'या' कंपनीने सुरू केली रेल्वे तिकीट सेवा 'रेडरेल', आता मोबाईलवरून रिझर्व्हेशन करता येणार
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 12:23 AM
Share

नवी दिल्लीः ऑनलाईन बस तिकीट प्लॅटफॉर्म असलेल्या रेडबसने रेल्वे तिकिटाच्या कामातही उतरण्याचा निर्णय घेतलाय. आता रेडबसच्या अॅपद्वारे लोक आता त्याच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेनचे तिकीट बुक करण्यास सक्षम असतील. IRCTC देशात रेल्वे तिकिटाच्या कामात अव्वल आहे. रेड बस आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या सहकार्याने रेल्वे तिकीट बुकिंग सेवा सुरू करत आहे. यामुळे मोबाईल युजर्सना खूप मदत होणार आहे, कारण बरेच लोक RedBus च्या अॅपद्वारे ट्रेनचे तिकीट सहजपणे बुक करू शकतात.

IRCTC वरून लोक ऑनलाईन बुकिंग करतात

IRCTC रेडबसचा अधिकृत भागीदार असेल. RedBus ने या सेवेला redRail असे नाव दिले आहे. IRCTC ही रेल्वे तिकिटांच्या बुकिंगमध्ये अग्रगण्य संस्था आहे, जी भारतीय रेल्वेची एकमेव कंपनी आहे. याद्वारे लोक ऑनलाईन बुकिंग करतात. तिकीट रद्द केल्यावर आयआरसीटीसीकडून पैशांचा परतावा देखील दिला जातो.

रेडरेल कसे वापरावे?

जर तुम्हाला रेडबसच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेनचे तिकीट बुक करायचे असेल तर त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये रेडबसचे अॅप असणे आवश्यक आहे. अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांना अॅपच्या माध्यमातून बससोबतच रेल्वे प्रवासाचे तिकीटही बुक करता येणार आहे, असेही रेडबसने म्हटलेय. एकाच अॅपवर बस आणि ट्रेनचे तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध असेल. अधिकृत निवेदनात, RedBus ने म्हटले आहे की, redRail डेस्कटॉप, मोबाइल वेब आणि iOS फोनवर उपलब्ध असेल.

IRCTC सह करार

RedBus नुसार, लोक RedRail वरून तिकीट बुकिंगच्या सर्वोच्च सुविधेचा लाभ घेऊ शकतील. कंपनीने यासाठी ग्राहक समर्थन प्रणाली तयार केलीय. ट्रेनमध्ये चढतानाही लोक तिकीट काढू शकतील. रेडबसचे म्हणणे आहे की, ट्रेनमध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्या लोकांना आरक्षणाची काळजी करण्याची गरज नाही. तिकीट रद्द करूनही काळजी करण्याची गरज नाही, कारण रद्द केल्यावर खात्यात त्वरित पैसे परत केले जातील. प्रवाशांच्या भाषा आणि बोलींचीही काळजी घेण्यात आली असून, अॅपमध्ये 5 प्रादेशिक भाषांमध्ये काम करण्याची सुविधा देण्यात आलीय.

रेडबस काय म्हणाली?

रेडबस सध्या ‘इंट्रोडक्टरी ऑफर’ चालवत आहे आणि रेडरेल यासाठी कोणतेही सेवा शुल्क किंवा पेमेंट गेटवे शुल्क आकारत नाही. रेडबसचे सीईओ प्रकाश संगम IRCTC सोबतच्या करारावर म्हणाले, “RedBus IRCTC सोबत टायअप करण्यास खूप उत्सुक आहे, कारण ते रेल्वेच्या दैनंदिन 1 कोटी प्रवाशांना सेवा देण्यास मदत करतील. हा असा नंबर आहे ज्याची सेवा देशातील लोक IRCTC द्वारे घेतात. IRCTC वर संपूर्ण सुविधेसह सुरक्षित मार्गाने ट्रेनचे ऑनलाईन बुकिंग करा. मार्केट लीडर म्हणून आम्‍ही पुरवत असलेली सेवा इंटरसिटी बस प्रवाशांना सुप्रसिद्ध आणि प्रशंसनीय आहे.

संबंधित बातम्या

सरकार म्हणते 26,697 कोटी रुपये बँकांमध्ये पडून, तुमचे पैसे तर नाहीत ना? असे तपासा

मोदी सरकार आता CEL कंपनीला विकणार, एअर इंडियानंतर दुसऱ्या मोठ्या कंपनीचं खासगीकरण

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.