महिलांमध्ये घर खरेदीचा कल वाढला, जाणून घ्या घर खरेदीवर मिळणारे फायदे

नुकतेच एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांनी गृह कर्जावरील व्याज दर कमी केले आहे. या बँका आता 6.5-6.7 च्या दरम्यान व्याज दराने गृह कर्जे प्रदान करीत आहेत. तथापि, हे दर 31 मार्च 2021 पर्यंत आहेत.(The trend of buying a house has increased among women, know the benefits of buying a house)

महिलांमध्ये घर खरेदीचा कल वाढला, जाणून घ्या घर खरेदीवर मिळणारे फायदे
महिलांमध्ये घर खरेदीचा कल वाढला

नवी दिल्ली : वर्क फ्रॉम होमचा परिणाम म्हणा किंवा कोविड 19 चा बदल म्हणा, मात्र स्त्रियांमध्ये घरगुती खरेदीचा कल पुरुषांपेक्षा जास्त आहे. हिच घर खरेदी करण्याची योग्य वेळ असल्याचे 70 टक्के पेक्षा अधिक स्त्रियांचे मानणे आहे. परवडणारी आणि मध्यम-सेगमेंटच्या घरांनाही मोठी मागणी आहे. अनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्सच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, 62 टक्के महिलांना मालमत्ता वर्गातील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे तर 54 टक्के पुरुष सोने, शेअर मार्केट आणि एफडीच्या तुलनेत रिअल इस्टेटची निवड करतात. (The trend of buying a house has increased among women, know the benefits of buying a house)

मोठ्या घरांना अधिक प्राधान्य

अहवालानुसार, 82 टक्के महिलांना वापरासाठी घर खरेदी करायचे आहे, 18 टक्के महिलांना केवळ गुंतवणूक म्हणून घर खरेदी करायचे आहे. दुसरीकडे, 68 टक्के पुरुष वापरण्यासाठी घर खरेदी करण्याची इच्छा ठेवतात तर 34 टक्के पुरुष गुंतवणूक म्हणून घर खरेदी करु इच्छितात. परवडणारी व मध्यम-सेगमेंटची घरे ज्यांची किंमत 90 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशी घरे खरेदी करण्याकडे अधिक कल आहे. बहुतेक महिलांनी मोठ्या घराला प्राधान्य दिले आहे.

रेडी टू मुव्ह घरांना अधिक पसंती

एनारॉकच्या ग्राहक सेवा अहवालानुसार 28 टक्के स्त्रिया स्वस्त गृहकर्जांमुळे घर विकत घेण्याच्या विचारात आहेत, तर २२ टक्के स्त्रिया सध्याच्या ऑफर आणि सवलतींच्या आकर्षणामुळे घर खरेदी करु इच्छितात. त्याचबरोबर अहवालात असेही म्हटले आहे की, सर्वेक्षण केलेल्या 71 टक्के महिला रेडी टू मूव्ह-इन घरे निवडत आहेत.

महिलांसाठी घर खरेदीचे मोठे फायदे

सबसिडी – महिलांना घरे खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून राज्यस्तरावर अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (पीएमएवाय) लोअर इनकम ग्रुप (एलआयजी) किंवा इकोनॉमिक विकर सेक्शन कॅटेगरी (ईडब्ल्यूएस) अंतर्गत अनुदान घेण्याकरीता घरातील एका महिलेला मालकी देणे बंधनकारक आहे.

मुद्रांक शुल्कात सूट – बर्‍याच राज्यात महिलांसाठी घरे खरेदी केल्यावर मुद्रांक शुल्क कमी केले जाते. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये महिलांना घर खरेदीवर मुद्रांक शुल्कात काही सूट दिली जाते. ही सूट 1-2 टक्क्यांपर्यंत असू शकते. त्याचबरोबर, पंजाबमधील पुरुष आणि महिलांसाठी निश्चित केलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये 4 टक्क्यांचा फरक आहे.

बँकेकडून सूट – बँकांकडूनही गृह कर्जात महिलांना बरीच सवलत देण्यात आली आहे. घर खरेदी करताना तत्कालीन व्याजदरापेक्षा 0.25-0.5 टक्क्यांनी कमी दराने महिलांना गृहकर्ज मिळते, तर सह-मालक म्हणून गृह कर्जाची मर्यादा देखील वाढवता येते. सह-मालक झाल्यावर पती-पत्नी दोघेही आयकर कपात करण्याचा दावा करू शकतात. (The trend of buying a house has increased among women, know the benefits of buying a house)

इतर बातम्या

भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी मुलाला ZP अध्यक्षपद कसं द्यावं? शिवसेनेला प्रश्न

रिया चक्रवर्तीने सुशांतला ड्रग्ज दिले, एनसीबीच्या चार्जशीटमध्ये आरोप; रियाच्या अडचणीत वाढ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI