AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकेकाळी या महिलेने मुकेश अंबानी यांना टाकलं होतं पिछाडीवर, आता एक दिवसांत 56 हजार कोटी..

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मेयर्स यांची एकूण संपत्ती 56 हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे. आता त्यांची एकूण संख्या 100 अब्ज डॉलरच्या खाली आली नाही. एवढंच नव्हे तर श्रीमंतांच्याही यादीत त्या खाली घसरल्या आहेत.

एकेकाळी या महिलेने मुकेश अंबानी यांना टाकलं होतं पिछाडीवर, आता एक दिवसांत 56 हजार कोटी..
| Updated on: Feb 13, 2024 | 8:45 AM
Share

richest woman in world | जगातील सर्वात श्रीमंत स्त्रीला कोण ओळखत नाही ? त्यांनी अलीकडच्या काळात संपत्तीत मुकेश अंबानींनाही मागे टाकले होते आणि 100 कोटी डॉलर्सच्या संपत्तीसह त्या इतिहासातील पहिली महिला अब्जाधीश बनल्या होत्या. हो, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स आहे. मात्र त्यांच्या नेटवर्थमध्ये शुक्रवारी सर्वात मोठी घसरण झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मेयर्स यांची एकूण संपत्ती 56 हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या खाली आली. एवढंच नव्हे तर श्रीमंतांच्याही यादीत त्या खाली घसरल्या आहेत. त्याची एकूण संपत्ती किती उरली जाणून घेऊया.

गमावले 56 हजार कोटी

जगातील सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक असलेल्या लॉरिअल या कंपनीच्या संस्थापकाची नात आणि जगातील सर्वात श्रीमंत महिला फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स यांच्या एकूण संपत्तीत सुमारे 6.8 अब्ज डॉलर्सची मोठी घट झाली. जी एकूण 56,4,50.03 कोटी रुपये आहे. BlueGarb Billionaires Index नुसार, शुक्रवारी जगातील संपत्तीत सर्वात मोठी घट दिसून आली. किंबहुना, लॉरियलच्या शेअरच्या किमतीत घसरण झाली असून मेयर्सच्या संपत्तीमधील घसरण हेच त्यासाठी कारणीभूत आहे. L’Oreal चे समभाग 7.5 टक्क्यांहून अधिक घसरले. FactSet डेटानुसार, L’Oreal च्या शेअर्समध्ये 27 ऑक्टोबर 2008 पासून सर्वात मोठी घसरण झाली. .

अंबानींनाही टाकलं होतं मागे

ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, लॉरिअल एसएच्या शेअर्सने नवा उच्चांक गाठल्याने त्यांची संपत्ती डिसेंबर महिन्यात $100.1 बिलियन झाली. त्यानंतर असे करणारी ती जगातील पहिली सर्वात श्रीमंत महिला ठरली. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनाही मेअर्स यांनी मागे टाकले होतं. या घसरणीनंतर मुकेश अंबानी 109 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 11 व्या सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले. तर गौतम अडाणी हे त्यांच्या मागामोग असून 101 अब्ज डॉलर्ससह जगातील 12 वे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले.

मुलं काय करतात ? मेयर्स या 241 अब्ज पौंड ($268 अब्ज) किमतीच्या L’Oréal या जागतिक कंपनीच्या सर्वात मोठ्या भागधारक आहेत. तसेच त्या संचालक मंडळाच्या उपाध्यक्षही आहेत. त्यांची मुलं, जीन-व्हिक्टर आणि निकोलस मेयर्स हे चित्रपट निर्माते आहेत.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.