AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

currency : 500, 1000 रुपयांचे नशीब पालटणार, पुन्हा कमाईची संधी, लपविलेले बंडल काढा की बाहेर, सर्वोच्च न्यायालयातून मिळेल दिलासा?

currency : 500, 1000 रुपयांच्या नोटांचे लवकरच नशीब पालटणार आहे..

currency : 500, 1000 रुपयांचे नशीब पालटणार, पुन्हा कमाईची संधी, लपविलेले बंडल काढा की बाहेर, सर्वोच्च न्यायालयातून मिळेल दिलासा?
नोटा बदलण्याची पुन्हा कसरत?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 27, 2022 | 4:41 PM
Share

नवी दिल्ली : देशभरात बाद झालेल्या 1000 रुपयांच्या आणि 500 रुपयांचे नशीब लवकरच पालटण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या (Demonetization) काळात या नोटांवर गंडातर आले होते. या नोटा (Currency) बदलण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येऊ शकते. याविषयीचे संकेत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी ज्यांना नोटा बदलण्याची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी हा दिलासा मिळू शकतो. पण त्यासाठी अजून काही वेळ वाट पहावी लागणार आहे.

नोटाबंदीच्या अधिसूचनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. याविषयी घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी या याचिकांवर सुनावणी झाली. त्यात पुन्हा नोटा बंदीच्या काळातील बाद नोटांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

न्यायमूर्ती एस. ए. नजीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय पूर्णपीठासमोर सुनावणी झाली. याप्रकरणी जुन्या नोटा बदलण्यासाठी व्यवस्था तयार करण्याविषयी विचार करण्याचे संकेत दिले. काही विशेष प्रकरणातच ही सुविधा देण्यात येणार आहे. याचिकांवर 5 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.

या याचिकांमध्ये नोटाबंदी संदर्भातील 8 नोव्हेंबर 2016 रोजीची अधिसूचना अवैध असल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्र सरकारतर्फे अॅटर्नी जनरल वेंकटरमणी यांनी युक्तीवाद केला की, कोर्ट या प्रकरणात कुठलेही आदेश देऊ शकत नाही.

नोटबंदी काळात नागरिकांना नोटा बदलता याव्यात यासाठी कालावधी बराच वाढविण्यात आला होता. केंद्र सरकारने नागरिकांच्या सुविधेसाठी मुदत वाढवून दिली होती. परंतु, जनतेने त्याचा फायदा घेतला नाही.

अॅटर्नी जनरल यांनी नागरिकांसाठी देण्यात आलेल्या सुविधांचा पाढा वाचला. तसेच काही विशेष प्रकरणात सरकार नोट बदलून देण्यासाठी व्यवस्था करण्याचा विचार करु शकते, असे निवेदन केले.

दहशतवाद्यांना होणारे टेरर फंडिंग रोखण्यासाठी आणि बोगस नोटांवर कारवाईसाठी केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला होता, अशी बाजू वेंकटरमणी यांनी मांडली. त्यांनी नोटबंदीच्या अधिसूचनेच्या बाजूने युक्तीवाद केला.

नोटबंदीचा निर्णय हा रिझर्व्ह बँक कायदा, 1934 नुसार घेण्यात आला. त्यामुळे त्यात कोणतीही कायदेशीर अडचण नाही. पण आता या याचिकांवर विचार करणे गरजेचे नसल्याचा युक्तीवादही करण्यात आला.

सुनावणीअंती, कोर्टाने याप्रकरणात नोटा बदलण्यासाठी एक व्यवस्था तयार करण्यासाठी आम्ही विचार करु, 500, 1000 नोटा बदलण्याचा पर्यायावर विचार करण्यात येईल, असे तोंडी सांगितले.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.