AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झटपट कर्जाच्या नावाखाली फसवणूक करतात हे 10 लोन ॲप्स, जाणून घ्या

झटपट कर्जाच्या आमिषाला बळी पडून काही बनावट ॲप्स डाउनलोड केल्याने तुमची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. सायबर दोस्तने 10 बनावट लोन ॲप्सची नावे उघड केली आहेत आणि सुरक्षित राहण्यासाठी काही उपयुक्त टिप्सही दिल्या आहेत. चला आजच्या लेखात याबद्दल जाणून घेऊयात.

झटपट कर्जाच्या नावाखाली फसवणूक करतात हे 10 लोन ॲप्स, जाणून घ्या
Loan App
| Edited By: | Updated on: May 28, 2026 | 5:08 PM
Share

पैशांची गरज कधी कोणाला कुठे कशी लागेल काही सांगता येत नाही. मग ते नवीन घर घेणे असो वा गाडी प्रत्येकजण 10 मिनिटांत इन्स्टंट कर्ज मिळवण्याचा पर्याय शोधत असतात. कधीकधी सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना आपल्याला असे एखादे ॲप दिसते जे जलद आणि सोपे कर्ज देण्याचा दावा करते. तसेच त्यांच्या आकर्षक जाहिराती कोणत्याही देवदुतापेक्षा कमी वाटत नाहीत. अशातच आपण कोणताही विचार न करता ते ॲप डाउनलोड करतो. ज्यात फसवे लोक तुमच्या गरजेचा फायदा घेण्यासाठी जाळे टाकून बसलेले असतात. पण आपली ही छोटीशी चूक फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकवते. अलीकडेच सायबर दोस्तने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये काही बनावट कर्ज ॲप्सची नावे नमूद केली आहेत, जे एनबीएफसीच्या (NBFC) नावाखाली लोकांना टार्गेट करत आहेत. चला तर फसवणूकीपासून वाचण्यासाठी बनावट कर्ज ॲप्सची नावे जाणून घेऊयात.

सायबर दोस्त (गृह मंत्रालयाच्या अंतर्गत) झटपट कर्ज देण्याचा दावा करणारे ॲप्स डाउनलोड करणे महागात पडू शकते. हे ॲप्स लोकांना आकर्षक ऑफर्सचे आमिष दाखवतात आणि नंतर त्यांची वैयक्तिक माहिती, संपर्क आणि आर्थिक तपशिलांचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करतात. सायबर दोस्तने लोकांना लक्ष्य करणाऱ्या एक-दोन नव्हे, तर तब्बल 10 बनावट कर्ज ॲप्सची नावे उघड केली आहेत.

1. सफलस्कोर सुलभ कर्ज (SafalScore Easy Loan)

2.फिनक्युअर क्रेडिट असिस्टंट (FinCure Credit Assistant)

3. फ्लेक्सीलोन ईएमआय (FlexiLoanEMI)

4. इझीक्रेडिटचेक (EasyCreditCheck)

5. फिनमोना वैयक्तिक क्रेडिट (FinMona Personal Credit)

6. धनाश्री सल्ला (DhanaShree Salah)

7. रुपीजार ॲसेट ॲक्सेस (RupeeJar Asset Access)

8. एस लार्ज क्विक लोन असिस्टंट (S Large Quick Loan Assistant)

9. लोन ब्लूम (Loan Bloom)

10. ब्रिओ क्रेडिट क्रेडिट असिस्टंट (Brio Credit Credit Assistant)

सुरक्षित राहण्यासाठी टिप्स

कोणतेही कर्ज ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्या ॲपची सत्यता पडताळून पाहणे महत्त्वाचे आहे.

आरबीआयच्या अधिकृत NBFC यादीमध्ये कंपनीचे नाव नक्की तपासा.

लोक ॲपला देत असलेल्या प्रतिक्रिया आणि ॲपने मागितलेल्या परवानग्यांकडे नक्की लक्ष द्या.

लक्षात ठेवा की प्रत्येक सुलभ कर्ज सुरक्षित नसते पडताळणी आवश्यक आहे..

फसवणूक झाल्यास काय करावे?

सायबर दोस्तकडून सल्ला देण्यात आला आहे की जर कोणी सायबर फसवणुकीचा बळी ठरले असेल तर त्या व्यक्तीने तात्काळ 1930 वर फोन करावा किंवा http://cybercrime.gov.in वर जाऊन आपल्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल तक्रार नोंदवावी.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?