AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोस्ट ऑफीसच्या या योजना करतील मालामाल, करातूनही मिळेल मोठी सूट

पोस्ट ऑफीसच्या या पाच प्रमुख गुंतवणूक योजना बचतीसह चांगला परतावा देखील देता आणि टॅक्समधून सुट देखील मिळते. या योजनेत ७.५ टक्के ते ८.२ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. या योजना प्रत्येक वर्षांसाठी फायदेमंद आहेत.

पोस्ट ऑफीसच्या या योजना करतील मालामाल, करातूनही मिळेल मोठी सूट
| Updated on: Sep 14, 2025 | 4:16 PM
Share

जर तुम्हाला पैसे सुरक्षित जागी गुंतवायचे असतील आणि चांगला परतावा मिळवायचा असेल, तर पोस्ट ऑफीसची बचत योजना तुमच्यासाठी भरोसेमंद पर्याय सिद्ध होऊ शकते. या योजना न केवळ तुमची गुंतवणूक सुरक्षित करतात तर ७.५ टक्यांपासून ८.२ टक्क्यांपर्यंत आकर्षक व्याजही देतात. तसेच या योजनेंतर्गत टॅक्समधून सुट देखील मिळते,जी तुमची बचतीला आणखीन वाढवू शकते. चला तर पाहूयात पोस्ट ऑफीसच्या सहा प्रमुख बचत योजनांची माहिती, ज्याचा तुम्ही फायदा उठवू शकता.

१.पोस्ट ऑफीस फिक्स्ड डिपॉझिट ( FD )

पोस्ट ऑफिसच्या FD योजनेत तुम्ही १,२,३ वा ५ वर्षांसाठी पैसा गुंतवू शकता. खास बाब म्हणजे ५ वर्षांच्या एफडीवर तुम्हाला ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. तसेच यात योजनेत गुंतवणूक केल्यानंतर आयकर कलम ८० सी अंतर्गत टॅक्समधून सुट मिळते. ही योजना त्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे जे गुंतवणूक सुरक्षित ठेवू इच्छीतात आणि ज्यांना निश्चित रिटर्न हवा असतो.

२. नॅशनल सेव्हींग सर्टिफिकीट (NSC)

जर तुम्हाला ५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर NSC तुमच्यासाठी बेस्ट आहे. या योजनेवर ७.७ टक्क्यांचे व्याज मिळते. तुमच्या पैशांवर दरवर्षी व्याज वाढत रहाते. तसेच या योजनेत गुंतवणूक केल्याने टॅक्समधून सुट देखील मिळते, जी या योजनेला लाभकारी बनवते.

३. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना जर सुरक्षित गुंतवणूक आणि चांगले रिटर्न हवे असतील त्यांच्यासाठी ही योजना बेस्ट आहे. या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते आणि व्याज दर ८.२ टक्क्यांपर्यंत आहे. तुम्हा यात कमाल ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता. या योजनेचा मोठा फायदा हा की व्याजदर ८.२ टक्क्यांपर्यंत मिळतो. त्यात किमान ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेचा आणखी एक फायदा की व्याज तिमाहीला मिळते. त्यामुळे तुम्हाला नियमित उत्पन्न मिळते.

४. सुकन्या समृद्धी योजना (SSY)

मुलींचे भविष्य सुरक्षित राखण्यासाठी ही एक चांगली योजना आहे.या योजनेत वर्षाला २५० रुपये ते १.५ लाख रुपये गुंतवणूक करता येते. या योजनेवर ८.२ टक्के व्याज मिळते. योजनेचा अवधी १५ वर्षांचा आहे. आणि ही योजना २१ वर्षांत मॅच्युअर होते. ही योजना मुलींचे शिक्षण आणि लग्न यासाठी एक मजबूत आर्थिक आधार बनू शकते.

५. किसान विकास पत्र (KVP)

जर तुम्हाला तुमची गुंतवणूक दुप्पट व्हावी असे वाटत असेल तर किसान पत्र योजना तुमच्यासाठी योग्य आहे. यात ११५ महिन्यात ( सुमारे ९.५ वर्षे ) तुमची जमा रक्कम दुप्पट होते. या योजनेवर ७.५ टक्के व्याज मिळते आणि किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक करतात येते. ही योजना त्या लोकांसाठी चांगली आहे. ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?