पतंजलीने गुंतवणूकदारांना दिली मोठी भेट, प्रत्येक एका शेअरवर दोन शेअर फ्री
पतंजली फूड्सने २:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले आहेत, ज्यामुळे कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या तीन पट वाढली आहे.

पंतजली फूड्सचे शेअर गुरुवारी सकाळी सुमारे ₹595 आसापास ट्रेड करत होते. तर एक दिवसाआधी हे ₹1,802.25 वर बंद झाले होत. शेअरच्या किंमतीतील इतकी घसरण बोनस शेअरची घोषणा आहे. कंपनीने अलिकडेच 2:1 बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा ही प्रत्येक शेअरसाठी तुम्हाला दोन नवीन शेअर फ्री मिळाले आहेत. म्हणजे जर तुमच्याकडे आधीच १०० शेर आहेत, तर हे बोनस शेअर मिळाल्यानंतर तुमच्याकडे एकूण 300 शेअर होतील.
एक्स -बोनसचा अर्थ काय ?
एक्स -बोनसचा अर्थ त्या तारखेनंतर शेअर खरेदी करणे जेव्हा कंपनी बोनस शेअर देणार असते, परंतू त्या बोनसचा हक्क तुम्हाला मिळत नाही. पतंजली फूड्सने १७ जुलै २०२५ रोजी सांगितले होते की ती तिच्या गुंतवणूकदारांना २:१ च्या प्रमाणात शेअर बोनस शेअर देणार. म्हणजे तुमच्याकडे एक शेअर असेल तर तुम्हाला दोन आणखीन शेअर मोफत मिळतील. यासाठी कंपनीने ११ सप्टेंबर २०२५ रोजी रिकॉर्ड डेट ठेवली होती. जे गुंतवणूकदार ११ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या जवळ शेअर बाळगतील ते या बोनसचे हक्कदार बनले. परंतू जे या तारखेनंतर शेअर खरेदी करतील त्यांना बोनस शेअर मिळणार नाहीत. ही संपूर्ण प्रोसेस तांत्रिक असते.या यामुळे गुंतवणूकदारांना एकूण शेअरच्या मूल्यावर दीर्घकाळ कोणताही वाईट परिणाम होणार नाही. याचा उद्देश्य शेअरचे मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढवणे आणि छोट्या गुंतवणूकदारांना जोडणे हा आहे.
कंपनीची स्थिती दमदार
बोनस शेअर जारी झाल्यानंतर पंतजली फूड्सचे एकूण शेअर कॅपिटल वाढून १०८.७५ कोटी शेअर झाले आहे. कंपनीने एकूण ७२.५० कोटी बोनस शेअर दिले आहेत. शेअरहोल्डिंगच्या बाबत बोलायचे तर ३० जून २०२५ पर्यंत प्रमोटर्सजवळ कंपनीचे ३६.७० टक्के शेअर होते. पब्लिक गुंतवणूकदारांकडे ३१.१७ टक्के हिस्सेदारी आहे. प्रमुख संस्थात्मक गुंतवणूकदारात LIC जवळ ९.१४ टक्के, म्युच्युअल फंड्सजवळ १.७२ टक्के आणि GQG Partners जवळ ४.५६ भागीदारी आहे. याशिवाय बाबा रामदेव यांची पंतजली आयुर्वेद आणि ग्रुपची इतर कंपन्या देखील या कंपनीमध्ये महत्वाची हिस्सेदारी राखतात. २०१९ मध्ये पतंजली ग्रुपने रुची सोया कंपनीला खरेदी करुन तिचे नाव पतंजली फूड्स ठेवले आहे.
