AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rule Change: सर्वसामान्यांना फटका बसणार, 1 ऑगस्टपासून ‘हे’ नियम बदलणार

1 ऑगस्ट 2025 पासून अनेक नियम बदलणार आहेत. यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्टपासून पेट्रोल, एलपीजीच्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो.

Rule Change: सर्वसामान्यांना फटका बसणार, 1 ऑगस्टपासून 'हे' नियम बदलणार
new rules
| Updated on: Jul 26, 2025 | 4:19 PM
Share

देशातील सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून अनेक नियम बदलणार आहेत. यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्टपासून पेट्रोल, एलपीजीच्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो. तसेय UPI पेमेंटबद्दलही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या सर्व बदलांची माहिती जाणून घेऊयात.

क्रेडिट कार्ड

एसबीआयच्या क्रेडिट कार्डधाकरकांसाठी महत्वाची बातमी आहे. 11 ऑगस्टपासून एसबीआय अनेक को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर मोफत हवाई अपघात विमा बंद करणार आहे. युको बँक, सेंट्रल बँक, पीएसबी, करूर वैश्य बँक, अलाहाबाद बँक आणि SBI काही एलिट आणि प्राइम कार्डवर 1 कोटी किंवा 50 लाखांचे कव्हर देत असे, मात्र आता ते मिळणार नाही.

एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल

प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी किंवा व्यावसायिक सिलेंडरच्या किमती बदलतात. त्यामुळे आताही त्यात बदल होण्याची शक्यता आहे. 1 जुलै रोजी व्यावसायिक सिलेंडर 60 रुपयांनी स्वस्त झाला होता. त्यामुळे आता 1 तारखेला ही किंमत बदलणार की तशीच राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सीएनजी-पीएनजीच्या किमतीत बदल

1 तारखेला सीएनजी-पीएनजीच्या किमतीतही बदल होत असतो, मात्र एप्रिलपासून या किंमती स्थिर आहेत. मात्र आता त्यात बदल होण्याची शक्यता आहे. या किमती वाढल्यास सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

एटीएफच्या किमती

1 ऑगस्टपासून एअर टर्बाइन फ्युएल (विमानाचे इंधन) च्या किमतीत बदल होऊ शकतो. याच्या किमती वाढल्या तर विमानाच्या तिकीटाच्या किमती वाढू शकतात. तसेच इंधनाची किंमत कमी झाली तर विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे.

UPO चे नियम बदलणार

1 ऑगस्टपासून यूपीआचे नियम बदलत आहेत. पेटीएम, फोनपे, जीपे किंवा इतर प्लॅटफॉर्मचा वापऱ्यांसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही नवीन नियम आणले आहेत. यानुसार तुम्ही तुमच्या यूपीआय अॅपवरून दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स चेक करू शकणार आहेत. तसेच ऑटोपे व्यवहार आता फक्त सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत आणि रात्री 9.30 नंतर करता येणार आहे. यासह इतरही काही बदल होणार आहेत.

राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.