काय हे? आधार-पॅनकार्ड लिंक करायला वेळच मिळाला नाही? आता शेवटची संधी, नाही तर झब्बू बसणार!

बंद झालेल्या पॅनकार्डचा वापर तुम्ही ओळखपत्र म्हणून करु शकणार नाही. तसा करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दंड लागणार आहे. प्राप्तिकर अधिनियम 1961 चा नियम 272 B नुसार, तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.

काय हे? आधार-पॅनकार्ड लिंक करायला वेळच मिळाला नाही? आता शेवटची संधी, नाही तर झब्बू बसणार!
तर बसणार दुप्पट भूर्दंड
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Jun 25, 2022 | 10:59 AM

Pan Aadhar Link Last Date: आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. 30 जून ही हे दोन ओळखपत्र जोडण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आधी हातची सगळी कामं सोडून हे अगदी काही मिनिटांत होणारे काम पूर्ण करा. जर आता ही तुम्ही आळस केला तर तुम्हाला पहिल्या पेक्षा ही जास्त भुर्दंड(Double Penalty) पडेल. ही अंतिम मर्यादा उलटून गेली तर मात्र तुम्हाला जोरदार झब्बु बसल्याशिवाय राहणार नाही. यापू्वी आधारला (Aadhar card) पॅन कार्ड (Pan Card) लिंक करण्याची 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख होती. पण इंटरनेट समस्या आणि कोरोनाची कारणे देत ही अंतिम मुदत पुढे ढकलण्यात आली होती. 31 मार्च ते 30 जून पर्यंत आधार कार्ड पॅन सोबत जोडण्यासाठी सध्या30 500 रुपये दंड वसुल करण्यात येत आहे. जर तुम्ही या 30 जून पर्यंत आधार आणि पॅनकार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला दुप्पट भूर्दंड पडणार आहे.

मार्च महिन्यानंतर नाही मिळणार या सुविधा

प्राप्तिकर अधिनियम(Income Tax Act) चे नियम 234 H नुसार, 30 जूननंतर 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी 1,000 रुपयांचा दंड जमा करावा लागणार आहे. तोपर्यंत म्हणजेच मार्च 2023 पर्यंत तुमचे पॅनकार्ड वैध राहिल. या कारणांमुले तुम्ही सहजच 2022-23 साठी ITR दाखल करु शकाल. मात्र त्यानंतर तुम्हाला मार्च महिन्यानंतर ही सुविधा मिळणार नाही.

भरावा लागेल दुप्पट दंड

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 31 मार्च 2022 रोजी नंतर आणि 30 जून 2022 च्या अगोदर पॅन कार्ड आधारशी जोडण्यासाठी 500 रुपये विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हे विलंब शुल्क आकारण्यात येत आहे. 30 जून नंतर हे शुल्क दुप्पट करण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक करम्यासाठी 1,000 रुपये दंड द्यावा लागणार आहे. जर तुम्हाला हा दुप्पटचा भूर्दंड नको असेल तर तातडीने पॅन कार्ड आधार सोबत लिंक करा.

हे सुद्धा वाचा

तर बसेल 10 हजारांचा दंड

वारंवार सांगूनही तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यामुळे तुम्हाला म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट अथवा बँकेतील खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक असताना ते निष्क्रिय असल्याने या सेवा मिळणार नाहीत. तसेच या बंद झालेल्या पॅनकार्डचा वापर तुम्ही ओळखपत्र म्हणून करु शकणार नाही. तसा करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दंड लागणार आहे. प्राप्तिकर अधिनियम 1961 चा नियम 272 B नुसार, तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें