AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stock : रेल्वे सेक्टरमधील या शेअरची कामगिरी दमदार, 1 लाख झाले 12.30 लाख

Multibagger Stock : रेल्वे सेक्टरमधील या शेअरने जोरदार कामगिरी बजावली आहे. या शेअरमुळे 1 लाखांची गुंतवणूक 12.30 लाख इतकी झाली आहे. गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई झाली आहे. तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे का?

Multibagger Stock : रेल्वे सेक्टरमधील या शेअरची कामगिरी दमदार, 1 लाख झाले 12.30 लाख
| Updated on: Jun 21, 2023 | 7:13 PM
Share

नवी दिल्ली : मोदी सरकारने गेल्या काही वर्षांपासून रेल्वे सेक्टरमध्ये अनेक विकास योजना राबविल्या आहेत. देशात अतिजलद रेल्वेचे युग अवतरत आहे. बुलेट ट्रेन येऊ घातली आहे. नवीन रेल्वे रुळाचे जाळे, विद्युतीकरणाचे काम झपाट्याने होत आहे. त्यामुळे या सेक्टरशी संबंधित सर्वच कंपन्यांना मोठ्या कार्यादेश, वर्कऑर्डर मिळत असून या कंपन्या फायद्यात आहेत. यामधील एका कंपनीच्या शेअरने (Share) सध्या कमाल केली आहे. या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा मोठा फायदा झाला आहे. रेल्वे वॅगन तयार करणाऱ्या या कंपनीचा शेअर 1100% वधारला आहे. रेल्वेचा विस्तार आणि वंदे भारत ट्रेन सुरु झाल्यापासून या कंपनीचा भविष्यकाळ जोरदार असल्याची चर्चा आहे.

तीनच वर्षातच छप्परफाड कमाई जुपिटर वॅगन लिमिटेडने (Jupiter Wagons) ही कमाल केली आहे. या शेअरने 3 वर्षांतच 1100 टक्के परतावा दिला आहे. हा शेअर मल्टिबॅगर शेअर ठरला आहे. या शेअरमध्ये 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 12.30 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे.

कशी बदलली या शेअरची चाल जुपिटर वॅगन लिमिटेडचा शेअर 3 वर्षांपूर्वी 22 जून 2020 रोजी 13.15 रुपयांचा होता. या आठवड्यात या कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 161.60 रुपयांवर पोहचला. अवघ्या 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने 1130 टक्क्यांची उसळी घेतली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना त्यावेळी जवळपास 7,605 शेअर खरेदी करता आले असते. सध्या कंपनीच्या उच्चांकी भरारी आधारे ही गुंतवणूक आता 12.30 लाख रुपयांच्या घरात पोहचली असती.

कंपनीची जोरदार कामगिरी जुपिटर वॅगनने जोरदार कामगिरी बजावली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना हा शेअर खरेदी न केल्याचे दुःख होत आहे. अवघ्या एकाच वर्षात या कंपनीचा हा शेअर झरझर वर चढला आहे. एका वर्षातच या कंपनीने प्रति शेअर 109.80 रुपये म्हणजे 238.70 टक्क्यांचा नफा नोंदवला आहे. एक वर्षांपूर्वी या शेअरचा भाव जवळपास 65 रुपये होता. एकाच महिन्यात या शेअरमुळे गुंतवणूकदारांना 36.05 टक्क्यांचा परतावा मिळाला.

आर्थिक बाजू सक्षम जुपिटर वॅगन्सचे बाजारातील भांडवल 6,222 कोटी रुपये आहे. गेल्या 5 वर्षांत या कंपनीचा नफा सातत्याने वाढत आहे. वर्ष 2019 मध्ये कंपनीचा नफा 216 कोटी रुपये होता. तर 2023 मध्ये हा नफा थेट 2,068 कोटी रुपयांवर पोहचला. कंपनीने केलेला हा मोठा रेकॉर्ड आहे.

काय करते कंपनी जुपिटर वॅगन्स ही रेल्वे वॅगन्स, पॅसेंजर कोच, वॅगन कंपोनेंट आणि कास्टिंगची निर्मिती करते. ही कंपनी भारतीय रेल्वेसाठी वॅगन, हाय-स्पीड पॅसेंजर, बोगी आदी काम करते. रेल्वेचा विस्तार आणि वंदे भारत ट्रेन सुरु झाल्यापासून या कंपनीचा भविष्यकाळ जोरदार असल्याची चर्चा आहे.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअरच्या कामगिरीची माहिती आहे. गुंतवणूकदारांनी अभ्यास करुन तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गुंतवणूक करावी.

Follow Us
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...