Loan Process | कर्ज घ्यायचा विचार करताय? मग ‘या’ 3 गोष्टींकडे लक्ष द्या…

जेव्हा गरज असेल तेव्हा बँक आपल्याला कर्ज घेण्याची सुविधा देते. पण त्यासाठी बँक बर्‍याच गोष्टींची तपासणी करते.

Loan Process | कर्ज घ्यायचा विचार करताय? मग ‘या’ 3 गोष्टींकडे लक्ष द्या...

मुंबई : जेव्हा गरज असेल तेव्हा बँक आपल्याला कर्ज घेण्याची सुविधा देते. पण त्यासाठी बँक बर्‍याच गोष्टींची तपासणी करते. त्या आधारे तुम्हाला कर्ज मिळू शकेल की, नाही हे ठरवले जाते. तसेच हे घटक लक्षात घेऊन तुमच्या कर्जाची रक्कमही निश्चित केली जाते. अशा परिस्थितीत आपल्याला त्या गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कारण जर आपण नेहमीच या गोष्टींची काळजी घेतली, तर आपल्याला भविष्यात कधीही अडचण येणार नाही (Tips for improving the chances of getting a new loan).

तसेच, यामुळे आपल्याला आवश्यक असलेली सर्व कर्जे सहज उपलब्ध होतील. तसेच, कर्ज मंजुरीची शक्यताही वाढेल. अशा वेळी बँक नेमक्या कुठल्या गोष्टी लक्षात घेते याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

क्रेडिट स्कोअर

कोणत्याही प्रकारचे कर्ज देताना सर्व प्रथम, बँक आपला क्रेडिट स्कोअर तपासते. त्या आधारेच कर्ज देण्याचा निर्णय घेतला जातो. आपला क्रेडिट स्कोर 750 किंवा त्याहून अधिक असणे कर्ज मिळवण्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. क्रेडिट स्कोअर बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असतो. यात, तुम्ही आधी घेतलेली कर्ज, क्रेडिट कार्डाची वापरलेली मर्यादा, पेमेंटच्या तारखा या गोष्टींचा समावेश असतो. म्हणूनच आपला क्रेडिट स्कोर कायम चांगला राहील याची काळजी घेतली पाहिजे.

कसा वाढेल क्रेडिट स्कोअर?

जर, आपण घर घेण्यासाठी कर्ज घेतले असेल, तर त्याच्या हप्त्याच्या तारखेची विशेष काळजी घ्या. वेळेवर हप्ता न भरल्यामुळे तुमची क्रेडिट स्कोअर खराब होतो. त्याच वेळी, लोक त्यांच्या वाढत्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या कार्डाची क्रेडिट मर्यादा सतत वाढवत असतात. आपण वेळेवर क्रेडिट कार्ड पेमेंट न केल्यास त्यामुळेही आपला क्रेडिट स्कोअर खराब होतो. तसेच, जर आपण कर्ज घेतले असेल तर ते वेळ मर्यादेच्या आधी परत करा (Tips for improving the chances of getting a new loan).

रिपेमेंट क्षमता

क्रेडिट स्कोअर आपला मागील आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती देटो. आतापर्यंतचा आपला रेकॉर्ड योग्य असेल, तर आपल्याला नवे कर्ज मिळू शकते. परंतु, यावेळी हे देखील तपासले जाते की जर आपल्याला आता कर्ज मिळाले तर आपण ईएमआय भरू शकता की नाही. या आधारे कर्जाची मान्यता दिली जाते.

तसेच हे देखील पाहिले जाते की, आपली किती टक्के कमाई ईएमआयमध्ये जात आहे, त्या आधारावरच पुढील निर्णय घेतला जातो. या प्रकरणात, आपले मासिक उत्पन्न देखील ईएमआयच्या आधारावर अनुकूल असले पाहिजे, जेणेकरुन आपल्याला कर्ज मिळणे सोपे होते. आपले उत्पन्न कमी असल्यास आपल्याला कर्ज मिळेल, परंतु, आपणास हवी तितकी रक्कम मिळू शकणार नाही.

ऑफर्सची तुलना

जेव्हा आपण कर्ज घेता तेव्हा आपण प्रत्येक बँकेच्या सुयोग्य ऑफर तपासू शकता. परंतु, जर आपल्याला कर्ज हवे असेल तर, आपल्याला वारंवार ऑनलाईन कर्जाबद्दल सर्च करू नका. तसेच, तुमचा क्रेडिट स्कोअर देखील वारंवार तपासू नका, याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो.

(Tips for improving the chances of getting a new loan)

हेही वाचा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI