LIC IPO: दीर्घ मुदतीसाठी या IPO मध्ये गुंतवणूक करावी की नफा घ्यावा? काय आहे तज्ज्ञांचे मत

बाजारात मोठा IPO असताना गुंतवणूकदारांनी नफ्याची नोंद करण्यावर लक्ष केंद्रित करू नये. तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूकदार बनायचे असेल तर चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा आणि LIC ही एक उत्तम कंपनी आहे.

LIC IPO: दीर्घ मुदतीसाठी या IPO मध्ये गुंतवणूक करावी की नफा घ्यावा? काय आहे तज्ज्ञांचे मत
आयुर्विमा महामंडळImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 12:34 PM

मुंबई : सोमवारी आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओ (IPO) चा शेवटचा दिवस आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये प्रचंड रस दाखवला आहे. शनिवारपर्यंत, किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीतील 6.9 कोटी राखीव समभागांसाठी एकूण 10.06 कोटी (1.46 वेळा) बोली प्राप्त झाल्या आहेत. तर पॉलिसी धारक श्रेणीमध्ये 4.67 पट आणि कर्मचारी श्रेणीमध्ये 3.54 पट सबस्क्रिप्शन प्राप्त झाले आहे. दुसरीकडे, ग्रे मार्केटमध्ये या आयपीओचा प्रीमियम सातत्याने कमी होत आहे. जागतिक बाजारपेठेत विक्री, वाढती महागाई आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांचे (Central Banks) वाढलेले व्याजदर असूनही, गुंतवणूकदार अजूनही या आयपीओकडं जात आहेत. आता प्रश्न असा पडतो की ज्यांनी या IPO मध्ये गुंतवणूक केली आहे त्यांनी कोणत्या मार्गावर पुढे जायचे. आयुर्विमा महामंडळामध्ये (LIC) दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टिकोन ठेवा, असे बहुतांश बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुंतवणूकदारांनी घाई करू नये. त्यांनी या आयपीओमध्ये त्यांच्या जोखमीच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करावी. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या IPO मध्ये नफ्यासाठी नोंद केली असेल तर त्यांने जरा धीर आणि अंतर ठेऊन गुंतवणूक करावी.

नफ्याची लिस्टिंग करण्याची पूर्ण क्षमता

इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्हीके विजय कुमार यांनी सांगितले की, कमी मूल्यांकनामुळे या IPO मध्ये नफा लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. जर एखाद्याला मध्यम मुदतीत फायदा मिळवायचा असेल तर त्याची सर्व शक्यता आहे. मार्केटमध्ये करेक्शनचा कालावधी सुरू आहे, त्यामुळे इतर अनेक स्टॉक्सही आकर्षक दरात मिळत आहेत. गुंतवणूकदारांनी ग्रोथ स्टॉक्सऐवजी व्हॅल्यू स्टॉकवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ही रणनीती आता कार्यरत आहे.

चांगल्या कंपन्यांमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक

रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, बाजारात मोठा IPO असताना गुंतवणूकदारांनी नफ्याची नोंद करण्यावर लक्ष केंद्रित करू नये. तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूकदार बनायचे असेल तर चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा आणि LIC ही एक उत्तम कंपनी आहे.

हे सुद्धा वाचा

डिस्काउंटवर आहे LIC ची व्हॅल्यूअशन

भारत सरकारने एलआयसीचे मूल्य 6 लाख कोटी रुपये ठेवले आहे. हे प्रत्यक्षात LIC च्या 5.4 लाख कोटींच्या एम्बेडेड मूल्याच्या 1.12 पट जास्त आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंट्सचे संतोष मीना यांनी म्हटले आहे की, प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत एलआयसीचे मूल्यांकन सवलतीत ठेवण्यात आले आहे. गुंतवणूकदारांनी हे समजून घेतले पाहिजे की विमा व्यवसाय हा दीर्घकालीन व्यवसाय आहे आणि एलआयसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केवळ दीर्घ कालावधीसाठी केली जाऊ शकते. तर दुसरीकडे काही तज्ज्ञांचे असं मत आहे की, महागाईमुळे बाजारातील लिक्विडिटी कमी करण्यात येत आहे. तर अजून बदल करण्यात येतील.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.