Today ATF price : जेट फ्यूलच्या दरात पुन्हा वाढ; विमान प्रवास महागणार?

व्यवसायिक एलपीजी सिलिंडर पाठोपाठ आज जेट फ्यूलच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. जेट फ्यूलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ सुरू असून, इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे विमान प्रवास महाग होण्याची शक्यता आहे.

Today ATF price : जेट फ्यूलच्या दरात पुन्हा वाढ; विमान प्रवास महागणार?
विमान इंधनाचे भाव वाढले
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 7:57 AM

मुंबई : आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel price) स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे महिन्याच्या पहिल्याच दिवशी जेट फ्यूलचे (ATF price today) दर वाढले आहेत. जेट फ्यूलमध्ये करण्यात आलेल्या नव्या वाढीसह राजधानी दिल्लीमध्ये जेट फ्यूलचे दर प्रति किलोलीटर 116851.46 रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईत (mumbai) प्रति किलोलीटर 115617.24, चेन्नईमध्ये 120728.03 किलोलीटर तर कोलकातामध्ये एटीएफचे दर प्रति किलोलिटर 117753.60 रुपयांवर पोहोचले आहेत. दिल्लीमध्ये एटीफचे दर प्रति किलोलिटर मागे 3649 रुपयांनी वाढले आहेत. कोलकातामध्ये 3677 रुपये प्रति किलोलिटर, चेन्नईमध्ये 3795 तर मुंबईमध्ये देखील जेट फ्यूलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे. जेट फ्यूलचे दर देखील गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाढत आहेत. वाढते एटीएफचे दर पहाता विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे.

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात वाढ

आज महागाईचे लागोपाठ दोन धक्के बसले आहेत. आज केवळ जेट फ्यूलच्याच दरात नाही तर व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. नव्या दरवाढीनुसार व्यवसायिक एलपीजी गॅसच्या दरात प्रति सिलिंडर मागे 104 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान मार्चमध्ये देखील सिलिंडरच्या दरात 268 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज पुन्हा एका व्यवसायिक सिलिंडर 104 रुपयांनी महागल्याने हॉटेल व्यवसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. हॉटलमधील जेवणाचे दर या आधीच वाढवण्यात आले आहेत. मात्र आता त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते.

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

राज्यात आज एकीकडे गॅस सिलिंडर आणि जेट फ्यूलचे दर वाढले आहेत. मात्र दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 26 व्या दिवशी स्थिर असल्याने सर्वसामान्यांना थोडासा का होत नाही दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असताना देखील देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणारा कर कमी करून, जनतेला दिलासा द्यावा असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र यावरून आता आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाल्याचे पहायाला मिळत आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.