‘या’ क्षेत्रात बम्पर रोजगाराची संधी, चार टॉप कंपन्या 91,000 फ्रेशर्सला नोकरी देणार

'या' क्षेत्रात बम्पर रोजगाराची संधी, चार टॉप कंपन्या 91,000 फ्रेशर्सला नोकरी देणार
jobs

अनेक आयटी कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान मोठ्या प्रमाणात नोकरभरतीची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे

Nupur Chilkulwar

|

Jan 20, 2021 | 11:04 AM

नवी दिल्ली : कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. त्यानंतर आता एक आनंदाची बातमी आहे (Top Companies May Hire 91000 Freshers). लॉकडाऊनच्या निर्बंधानंतर आता मोठ्या प्रामाणात नोकरभरती होणार आहे. अनेक आयटी कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान मोठ्या प्रमाणात नोकरभरतीची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चार टॉप कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजिज आणि विप्रोने यावर्षी कँपसमध्ये 91,000 जणांची भरती करण्याची योजना आखली आहे (Top Companies May Hire 91000 Freshers).

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) एग्झिक्युटीव्ह व्हीपी आणि ग्लोबल एचआर हेड मिलिंद लक्कडने नुकतंच प्रसारमाध्यांशी बोलताना सांगितलं, कंपनी पुढील आर्थिक वर्षात फ्रेशर्सची भरती करणार आहे. कंपनी यावर्षी जवळपास 40 हजार कँपस हायरिंग करतील.

इन्फोसिस 24,000 भरती करणार

इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आर्थिक वर्षात 24,000 कॉलेज ग्र्यॅजुएट्सची भरती करणार. यावर्षी कंपनीने 15,000 कँपस भरती करण्याची योजना बनवली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजिज पुढील आर्थिक वर्षात 15,000 जणांना नोकरीवर घेणार. यावर्षी कंपनीने 12,000 कँपस हायरिंग केलं होतं. विप्रो पुढील वर्षी 12,000 कँपस हायरिंग करण्याची योजना आहे. कंपनीने यावर्षीही इतक्याच भरती होणार आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजिजचे प्रमुख एचआर अधिकारी अप्पाराव वीवी यांनी सांगितलं, हायरिंगमध्ये तेजीचे अनेक कारणं आहेत. त्यांनी सांगितलं की, कंपनी निश्चित लक्ष्यापेक्षा 33 टक्के जास्त भरती करत आहेत. गेल्या वर्षी कंपनीने 70 टक्के भरती भारतमध्ये आणि 30 टक्के विदेशात झाली होती (Top Companies May Hire 91000 Freshers).

कंपन्यांना मिळाली मोठी डील

इन्फोसिसला यावर्षी सर्वात मोठी डील मिळाली. जर्मनीच्या ऑटोमोबाईल कंपनी डेमलरसोबत (Daimler) कंपनीची डील 3.2 अरब डॉलरची असल्याची माहिती आहे. टीसीएसला प्रुडेंशिअल फायनॅन्शिअलपेक्षा मोठी डील मिळाली. त्याचप्रमाणे विप्रोनेही जर्मन रिटेलर मेट्रोसोबत एक मोठी डील साईन केली आहे.

Top Companies May Hire 91000 Freshers

संबंधित बातम्या :

एक वर्ष मोफत सेवा घ्या, पण नोकर भरती करा, विनोद पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ग्रामविकास विभागात 28 हजार जागांच्या नोकरभरतीची खोटी जाहिरात, पुण्यात बोगस वेबसाईटवर गुन्हा

Job Vacancy | ‘या’ कंपनीच्या महसुलात मोठी वाढ, आगामी काळात 20 हजार जणांना नोकरी देणार

मोठी बातमी | नोकरी सोडताना नोटीस पीरियड पूर्ण न करणाऱ्यांना मोठा झटका!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें