AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Digital Rupees : आता एका क्लिकवर पाठवा 10 लाख! डिजिटल पेमेंट होणार सुपरफास्ट

Digital Rupees : आता एका क्लिकवर नागरिकांना चालता-बोलता मोठं-मोठे व्यवहार अगदी काही सेकंदात पूर्ण करता येतील. त्यासाठी त्यांना बँकेत जाऊन पॅनकार्ड वा तत्सम कागदपत्रे दाखविण्याची गरज पडणार नाही.

Digital Rupees : आता एका क्लिकवर पाठवा 10 लाख! डिजिटल पेमेंट होणार सुपरफास्ट
| Updated on: Jul 14, 2023 | 3:13 PM
Share

नवी दिल्ली : तुम्हाला सुखद धक्का बसेल की, भारतात डिजिटल रुपयांचा (Digital Rupees) वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटी केवळ एक लाख लोक डिजिटल मुद्रा, म्हणजे डिजिटल रुपयाचा वापर करत होते. पण आता हा आकडा 13 लाखांवर पोहचला आहे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रवीशंकर (RBI Deputy Governor T Ravishankar) यांनी या आठवड्यात एक महत्वपूर्ण संकेत दिले होते. त्यामुळे नागरिकांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना, व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.एका क्लिकवर नागरिकांना चालता-बोलता मोठं-मोठे व्यवहार अगदी काही सेकंदात पूर्ण करता येतील. त्यासाठी त्यांना बँकेत जाऊन पॅनकार्ड (Pan card) वा तत्सम कागदपत्रे दाखविण्याची गरज पडणार नाही.

या वर्षात व्यवहार मर्यादा वाढेल टी रवीशंकर यांच्या माहितीनुसार, देशात लवकरच केंद्र सरकार एकाच दिवशी लाखो रुपयांच्या व्यवहाराला मंजूरी देऊ शकते. सध्या डिजिटल रुपयाच्या माध्यमातून रोज 5,000-10,000 रुपयांचा व्यवहार होतो. आता नागरिकांना प्रत्येक दिवशी 10 लाख रुपये पाठविता येऊ शकतात. पायलट प्रकल्पात यापूर्वी 8 बँकांचा समावेश होता. आता 13 बँकांचा समावेश आहे. सध्या सीबीडीसी अंतर्गत 13 लाख लोक आहेत, यामध्ये तीन लाख व्यापारी आहेत.

क्यूआर कोडचा वापर एचडीएफसी बँकेने पण या महाअभियानात मोठी भूमिका निभावल्याचा दावा केला आहे. सेंट्रल बँक डिजिटल रुपया(CBDC) सोबत 1.7 लाखांपेक्षा अधिक व्यापाऱ्यांना जोडण्यात आले आहे. व्यवहार सुलभतेसाठी बँकेने ई-रुपया मंच सुरु केला आहे. त्यामाध्यमातून युपीआया क्यूआर कोडचा वापराने झटपट व्यवहार होत आहे.

डिजिटल रुपयाचा वापर वाढला या एप्रिल महिन्यात एक लाख लोक डिजिटल रुपयाचा वापर करणार होते. आता या आकड्याने 13 लाखांचा पण टप्पा ओलांडल्याचा दावा करण्यात आला आहे. सीबीडीसीनंतर केंद्रीय बँकेने जून महिन्यात युपीआय द्वारे डिजिटल रुपयाचे आपसात व्यवहाराची घोषणा करण्यात आली. एचडीएफसी बँकेने त्यासाठी युपीआय क्यूआर कोड सुरु करण्याची प्रक्रिया केली आहे. बँकेने यामध्ये आघाडी घेतली आहे. बँकेने यामध्ये व्यापाऱ्यांना त्यांच्या ग्राहकांकडून डिजिटल रुपया स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे व्यवहार प्रक्रियेत वाढ झाली आहे.

युपीआय क्यूआर कोड करा स्कॅन सीबीडीसी प्रयोगाशी जोडण्यात आलेले ग्राहकांना एक सुविधा देण्यात आली आहे. युपीआय क्यूआर कोड स्कॅन करुन ते डिजिटल रुपयामध्ये व्यवहार करु शकतील. एचडीएफसी बँक सध्या 26 शहरांमध्ये ई-रुपयाच्या माध्यमातून व्यवहाराला परवानगी देत आहे. यामध्ये प्रमुख मेट्रो सिटीसह भुवनेश्वर, गुवाहाटी, गंगटोक, इंदुर, भोपाळ, लखनऊ, पाटणा, कोच्ची, गोवा, शिमला, जयपूर, रांची, नागपूर, वाराणसी, विशापट्टणम, पुड्डुचेरी आणि विजयवाडा या शहरांचा यामध्ये समावेश आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.