Bank Check : चेकवर दोन लाइन का मारल्या जातात? याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?

Bank Check : तुमच्या चेकवर पेमेंट करण्याची सही, निशाणी, अमाऊंट, प्राप्तकर्त्याचं नाव, बँकेची डिटेल्स आदी माहिती असते. मात्र, चेकवर दोन लाइन मारल्या जातात. त्या का मारल्या जातात माहीत आहे का? चेकच्या एका कोपऱ्यात या दोन लाइन मारल्या जातात.

Bank Check : चेकवर दोन लाइन का मारल्या जातात? याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?
chk
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 4:50 PM

कोणतेही पेमेंट करण्यासाठी चेक हा एक उत्तम पर्याय आहे. डीजिटल पेमेंट पूर्वी चेक हेच पेमेंट करण्याचं महत्त्वाचं साधन होतं. आताही चेकचं महत्त्व तेवढच आहे. चेक म्हणजे बँकेकडून दिलेला एक पेपर असतो. त्याद्वारे ग्राहक पेमेंट करू शकतो. तुम्हीही कुणाला तरी चेकने पेमेंट केला असेल किंवा कुणाकडून तरी तुम्हाला चेकने पेमेंट मिळाला असेल. या चेकद्वारे तुम्ही लाखो रुपये एका अकाऊंटमधून दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करू शकता.

तुमच्या चेकवर पेमेंट करण्याची सही, निशाणी, अमाऊंट, प्राप्तकर्त्याचं नाव, बँकेची डिटेल्स आदी माहिती असते. मात्र, चेकवर दोन लाइन मारल्या जातात. त्या का मारल्या जातात माहीत आहे का? चेकच्या एका कोपऱ्यात या दोन लाइन मारल्या जातात. या लाइन मारण्याचं कारण काय? या दोन लाइन मारल्यानंतर चेकमध्ये काय बदल होतो. त्याचं काय महत्त्व आहे? त्यामुळे चेकला काही वेगळं वेटेज येतं का? यावरच आता आपण चर्चा करणार आहोत.

चेकवर या लाइन का मारल्या जातात?

या लाइन डिझाइन म्हणून मारल्या जात नाही. तर त्याचं वेगळं महत्त्व आहे. चेकवर या लाइन मारल्याने एक अट लागू होते. त्यामुळे काही बंधनं येतात. त्यामुळे तुम्ही कुणालाही चेक देणार असाल तर या लाइनचा विचार करूनच वापर करा. नाही तर समोरच्या व्यक्तीला पेमेंट काढताना अडचणी येऊ शकतात. ज्याच्या नावाने चेक बनवला गेला आणि ज्याला पैसे द्यायचे आहेत. त्याच्यासाठी या लाइन मारल्या जातात.

अर्थ काय?

या लाइन म्हणजे अकाऊंट पेयीचे संकेत असतात. ज्या व्यक्तीच्या नावाने चेक काढला आहे, त्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले जातात. समजा तुम्ही एखाद्या गणेश शर्मा नावाच्या व्यक्तिच्या नावाने एक चेक इश्यू केला असेल आणि तुम्ही त्या चेकवर या लाइन मारल्या असतील तर त्याचा अर्थ चेकवर लिहिलेली रक्कम गणेश शर्माच्या अकाउंटमध्ये जमा होईल. ही रक्कम कॅशच्या माध्यमातून काढली जाणार नाही. म्हणजे ज्याचं चेकवर नाव आहे, त्याच्या खात्यात पैसे जमा होईल.

अनेक लोक दोन लाइन मारल्यानंतर त्यावर Account Payee वा A/C Payee लिहितात. त्यावर हे चेकचे पैसे अकाऊंटमध्ये जमा झाले पाहिजे हे क्लिअर होतं. हे लिहिल्यानंतर जी व्यक्ती बँकेत चेक देतो, तो त्या द्वारे कॅश मिळवू शकत नाही. कारण हा चेक पैसे अकाऊंटमध्ये जमा करण्यासाठीचा असतो. अनेक चेकवर तर हे प्रिंटच केलेलं असतं.

मर्यादित चेक दिले जातात

जर तुम्हाला चेकने पैसे भरायचे असेल तर एक लक्षात ठेवा बँकेकडून मर्यादित संख्येने चेक दिले जातात. ग्राहकांना प्रत्येक वर्षी मर्यादितच चेक दिले जातात. जर अधिक चेकची गरज असेल तर बँक त्यासाठी चार्ज घेते. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून वर्षातून फक्त 10 चेक दिले जाता. इतर बँकांकडून 20-25 चेक मोफत दिले जातात.