‘पिक-आय’ ते ‘पी चाय’; सुंदर पिचाई यांचं नाव घेताना अमेरिकन सिनेटर अडखळले

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचं नाव उच्चारण्यासाठी अत्यंत सोपं असलं तरी अमेरिकनांसाठी मात्र पिचाई यांचं आडनाव उच्चारणं काहीसं कठिण झालं आहे.

'पिक-आय' ते 'पी चाय'; सुंदर पिचाई यांचं नाव घेताना अमेरिकन सिनेटर अडखळले
Google CEO Sundar Pichai

नवी दिल्ली: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचं नाव उच्चारण्यासाठी अत्यंत सोपं असलं तरी अमेरिकनांसाठी मात्र पिचाई यांचं आडनाव उच्चारणं काहीसं कठिण झालं आहे. त्यामुळे काही सिनेट सदस्यांनी त्यांना ‘पिक-आय’ म्हणून संबोधलं तर काहींनी ‘पी चाय’ म्हणून संबोधलं. सिनेटरच्या या उच्चारांमुळे आता नेटकऱ्यांनी त्यांची त्यांची सोशल मीडियावर चांगलीच खेचण्यास सुरुवात केली आहे. (US Senators Couldn’t Pronounce Google CEO Sundar Pichai’s Name)

गूगल, फेसबुक आणि ट्विटर सारख्या बड्या अमेरिकन कंपन्यांना सिनेटच्या एका बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं होतं. ही व्हर्च्युअल मिटिंग होती. यावेळी कॉमर्स, सायन्स आणि ट्रान्सपोर्टेशन कमिटीचे चेअरमन रोजर विकर यांनी सुरुवातीलाच सुंदर पिचाई यांचा उल्लेख करताना ‘पिक-आय’ असा केला. त्यानंतर सिनेटर कोरी गार्डनर, एमी क्लोबूचर यांनीही पिचाई यांचा चुकीचा उल्लेख केला. क्लोबूचर यांनी तर पिचाई यांचा उल्लेख ‘पी चाय’ असा केला. त्यानंतर अनेक सिनेटरने ‘पिक आय’ किंवा ‘पी चाय’ असाच पिचाई यांचा उल्लेख केला. त्यामुळे नेटकऱ्यांनी या सिनेटरची सोशल मीडियावरून चांगलीच खिल्ली उडवली आहे.

सुंदर पिचाई जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी गुगलचे (Google) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. भारतात जन्म झालेल्या सुंदर पिचाई यांनी 2004 मध्ये गुगलमध्ये कामाला सुरुवात केली होती. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमची डेव्हलपमेंट आणि 2008 मध्ये लाँच झालेल्या गुगल क्रोममध्ये त्यांची मोठी भूमिका राहिली आहे. सुंदर पिचाई हे गेल्या 15 वर्षांपासून गुगलमध्ये काम करत आहेत. त्यांनी एका साधारण कर्मचारीपासून गुगलच्या क्रोम ब्राऊजर, अँड्राईड टीमचे लीडर म्हणूनही काम केले आहे. तसेच जीमेल, अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टमवरही त्यांनी काम केले आहे. (US Senators Couldn’t Pronounce Google CEO Sundar Pichai’s Name)

संबंधित बातम्या:

Corona : कोरोनाला हरवण्यासाठी गुगलची धाव, सुंदर पिचाईचं आश्वासन

भारतात Google तब्बल 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार, सीईओ सुंदर पिचाईंची मोदींसोबत बैठक

गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंकडे नवी जबाबदारी, पगारात 200 टक्क्यांनी वाढ, महिन्याचा पगार किती?

(US Senators Couldn’t Pronounce Google CEO Sundar Pichai’s Name)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI