AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत अमिताभ बच्चन यांचे जावई? या व्यवसायाची धुरा आहे त्यांच्या हाती

Superstar Amitabh Bachchan | निखिल नंदा हे एस्कॉर्ट या समूहाचे मालक आहेत. आता हे नाव तुमच्या हमखास नजरेखालून गेले असेल. तुम्हाला कदाचित क्लिक पण झालं असेल. तर निखिल नंदा हे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे जावई आहेत. त्यांच्या आई रितू नंदा या बॉलिवूडचे पहिले शोमॅन राज कपूर यांची मुलगी आहे. त्यांच्यावर कपूर घराण्याचा मोठा प्रभाव आहे.

कोण आहेत अमिताभ बच्चन यांचे जावई? या व्यवसायाची धुरा आहे त्यांच्या हाती
| Updated on: Nov 28, 2023 | 2:05 PM
Share

नवी दिल्ली | 28 नोव्हेंबर 2023 : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांचा ‘प्रतीक्षा’ हा बंगला त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिच्या नावे केला. श्वेता बच्चन लाईमलाईटमध्ये असते. तिच्या पतीचे नाव निखिल नंदा आहे. तुम्हाला माहिती आहे का तिचे पती काय करतात ते? अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा हे एस्कॉर्ट या समूहाचे प्रमुख आहेत. हे नाव अगदी गावखेड्यात सुद्धा तुमच्या नजरेच्या टप्प्यात आले असेल. पण तुम्हाला आताच त्याचे कनेक्शन लक्षात येणार नाही. निखिल नंदा यांची आई पण बॉलिवूडमधीलच आहे. बॉलिवूडचे पहिले शोमॅन राज कपूर यांची मुलगी रितू नंदा या निखिल नंदा यांची आई आहेत. त्यांच्यावर कपूर घराण्याचा मोठा प्रभाव आहे.

एस्कॉर्टचे मालक निखिल नंदा

निखिल नंदा हे देशातील सर्वात मोठ्या समूहाचे सीईओ आहे. त्यांचे बॉलिवूड कनेक्शन तर सर्वांनाच माहिती आहे. द ग्रेट शोमॅन राज कपूर हे त्यांचे आजोबा आहेत. त्यांची पत्नी श्वेता बच्चन, ही त्यांची पत्नी आहे. ते सध्या एस्कॉर्ट्स लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. 2018 मध्ये त्यांचे वडील राजन नंदा हे त्यांच्या हातात संपूर्ण व्यवसाय सोपवून निश्चिंत झाले आहेत.

निखिल नंदा यांचे शिक्षण

18 मार्च 1974 रोजी निखिल नंदा यांचा जन्म झाला. त्यांनी डेहराडून येथील प्रसिद्ध प्रतिष्ठित दून शाळेतून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पेन्सिल्वेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. फायनान्स आणि मार्केटिंग हे त्यांचे विशेष विषय होते. त्यांनी श्वेता बच्चन हिच्यासोबत लग्न केले.

एस्कॉर्टची जबाबदारी

निखिल नंदा सध्या एस्कॉर्टस समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. 2018 मध्ये त्यांच्या वडिलांनी ही जबाबदारी त्यांच्या खाद्यांवर सोपवली. एस्कॉर्ट्स लिमिटेडची सुरुवात निखिल यांचे आजोबा हर प्रसाद नंदा यांनी 1944 मध्ये सुरु केली होती. ट्रॅक्टर, ट्रॉली, क्रेन, रोड रोलर्स हे तयार करण्याचे काम कंपनी करते. कंपनी इंजिनिअरिंग टूल्सचे उत्पादन करते. त्याची परदेशात निर्यात करते. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत या कंपनीचा महसूल 2,154.39 कोटी रुपये होता. गेल्या तिमाहीपेक्षा यामध्ये वार्षिक आधारावर 9.42 टक्क्यांची वाढ झाली. या कंपनीला 223.31 कोटींचा फायदा झाला. वार्षिक आधारावर एस्कॉर्टला 125.95 टक्क्यांचा नफा झाला.

मुलं पण नाहीत कमी

निखिल नंदा आणि श्वेता बच्चन यांना दोन मुलं आहेत. नव्या नवेली नंदा आणि अगत्स्य नंदा. नव्या नवेली नंदा हिने पॉडकास्टमध्ये चांगलीच ओळख निर्माण केली आहे. तर अगत्स्य नंदा लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. “द आर्चीज़” या जोया अख्तर यांच्या चित्रपटात तो एंट्री करणार आहे. त्याच्यासोबत सुहाना खान, खुशी कपूर, वेदांद रैना आणि मिहिर आहूजा असे इतर स्टार किड्स आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.