AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Short Selling : हे शॉर्ट सेलिंग म्हणजे काय रे भाऊ? कसा मिळतो सर्वाधिक ‘खाऊ’

Short Selling : हिंडनबर्ग रिपोर्टवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) प्राथमिक तपास पूर्ण केला आहे. त्यात 12 शॉर्ट सेलर फर्मने अदानी शेअरवर शॉर्ट सेलिंगच्या (Short Selling) माध्यमातून सर्वाधिक नफा कमाविल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अदानी समूह अडचणीत येण्याची शक्यता आहे. पण अनेकांना प्रश्न पडतो की हे शॉर्ट सेलिंग आहे तरी काय?

Short Selling : हे शॉर्ट सेलिंग म्हणजे काय रे भाऊ? कसा मिळतो सर्वाधिक 'खाऊ'
| Updated on: Aug 30, 2023 | 1:48 PM
Share

नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : हिंडनबर्ग रिपोर्टने (Hindenburg Report) यंदा झपाटल्यागत सूसाट धावणाऱ्या अदानी समूहाला वेसण घातलं. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहातील शेअरमध्ये गडबड असल्याचा आणि शॉर्ट सेलिंगचा आरोप हिंडनबर्ग या अमेरिकन शॉर्ट सेलिंग आणि रिसर्च फर्मने केला होता. त्यांनी अदानी समूहावर आरोपांची राळ उडवून दिली. प्रकरणात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अंमलबजावणी संचालनालयाने प्राथमिक तपास पूर्ण केला आहे. त्यात 12 शॉर्ट सेलर फर्मने अदानी शेअरवर शॉर्ट सेलिंगच्या (Short Selling) माध्यमातून सर्वाधिक नफा कमाविल्याचा दावा करण्यात आला आहे. सेबीसह ईडीने याप्रकरणात चौकशी केली आहे. अदानी समूहाच्या या ताज्या दाव्याने अडचणी वाढतील. आता शॉर्ट सेलिंग नेमकं आहे तरी काय, असा सवाल अनेकांना पडला आहे. शॉर्ट सेलिंगमुळे नेमकं काय साध्य होतं, कोणाला सर्वाधिक खाऊ मिळतो, कसा फायदा कमविल्या जातो, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहे.

अदानी समूहामुळे शॉर्ट सेलिंग चर्चेत

शॉर्ट सेलिंग वा शॉर्टिंग, हा शेअर बाजारातील एक एडवान्स ट्रेडिंग स्ट्रेटेजी आहे. या पद्धतीत एक ट्रेडर बाजारात भाग घेतो. हिंडनबर्ग रिसर्चमुळे हा शब्द देशात जास्तीत जास्त सर्च इंजिनमध्ये शोधल्या जात आहे. ट्रेडेड बांड्स आणि नॉन इंडियन ट्रेडेड डेरिवेटिव्स मध्ये शॉर्ट पोझिशन घेण्यात येते.

शेअर बाजारात शॉर्ट सेलिंग काय?

शॉर्ट सेलिंग ही अत्यंत क्लिष्ट ट्रेडिंग स्ट्रेटेजी असते. बाजारात उतरलेला ट्रेडर शेअर अत्यंत उंच किंमतीला विक्री करतो. नंतर निच्चांकी किंमतीवर तो शेअर खरेदी करतो. या दरम्यान त्याला मोठा फायदा होतो. सेबीने याला शॉर्ट सेलिंग अशी संज्ञा दिली. या ट्रेडिंगमध्ये, ट्रेडर त्याच्याकडे शेअर नसताना पण त्याची विक्री करतो. नंतर किंमती घसरल्या की शेअर खरेदी करतो.

शॉर्ट सेलिंग करतात तरी कशी?

बाजारात शॉर्ट सेलिंगचे तीन प्रकार आहेत. पहिला कॅश, दुसरा ऑप्शन आणि तिसरा प्रकार फ्युचर्स आहे. कॅशमध्ये केवळ इंट्रडे शॉर्ट सेलिंग करण्यात येते. तर ऑप्शन आणि फ्युचर्समध्ये शॉर्ट कॅरी फॉरवर्ड करता येतात. शॉर्ट सेलिंगवर सेबी या नियामकाची बारीक नजर असते.

शॉर्ट सेलिंगचे फायदे आणि नुकसान

शॉर्ट सेलिंगचा सर्वाधिक फायदा म्हणजे अल्पावधीत त्यांना मोठा नफा मिळतो. शॉर्ट सेलिंगचा सर्वात मोठा तोटा म्हणजे, शॉर्ट सेलिंगच्या सहायाने ग्रुप तयार करुन एखाद्या विशेष कंपनीचा शेअर टार्गेट करण्यात येतो. तो शेअर निच्चांकावर आणण्यात येतो. मोठ्या प्रमाणात शॉर्ट सेलिंग झाल्यावर बाजार अस्थिर होण्याची भीती असते.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.