AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exchange Traded Funds : सीपीएसई फंड म्हणजे काय; नव्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

भारतात गेल्या काही वर्षांपासून एक्सचेंज ट्रेडेड फंड खूप लोकप्रिय होत आहेत. या फंडात बरेचसे अनोखे उत्पादनं आहेत. असंच एक उत्पादन आहे Central Public Sector Enterprise म्हणजेच (CPSE) सीपीएसई हे थीमेटिक फंड आहे.

Exchange Traded Funds : सीपीएसई फंड म्हणजे काय; नव्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 22, 2022 | 2:10 AM
Share

भारतात गेल्या काही वर्षांपासून एक्सचेंज ट्रेडेड फंड खूप लोकप्रिय होत आहेत. या फंडात बरेचसे अनोखे उत्पादनं आहेत. असंच एक उत्पादन आहे Central Public Sector Enterprise म्हणजेच (CPSE) सीपीएसई हे थीमेटिक फंड आहे. थीमेटिक फंड हे इक्विटी फंड असतात आणि थीमवर आधारित शेअर्समध्ये फंडाद्वारे गुंतवणूक करण्यात येते. या फंडात कमी कालावधीत चांगला परतावा मिळतो. मात्र, सीपीएसईमध्ये विविध प्रकारच्या जोखिमसुद्धा आहेत. उदाहरणार्थ सीपीएसई ईटीईएफ साधारणपणे भारतातील टॉप रेटिंग असणाऱ्या सार्वजनिक कंपन्या (Public companies) म्हणजेच केंद्र सरकारच्या मालकीच्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. इंडियन ऑईल, एनटीपीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, पावर ग्रीड कॉरोपोरेशन, कोल इंडिया या सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक (investment) केली जाते. हा फंड Nippon India Asset Management Company द्वारा व्यवस्थापित केला जातो. गुंतवणूकदारांना नवीन युनिट जारी करणे आणि सब्सक्रिप्शन देण्याची जिम्मेदारी निप्पान इंडियाची आहे.

परतावा किती मिळतो?

ETF आपल्या कामगिरीची तुलना एखाद्या निश्चित बेंचमार्कसोबत करतात. CPSE ETF त्यांच्या कामगिरीची तुलना NIFTY CPSE एकूण रिटर्न इंडेक्ससोबत करतात आता सीपीएसईची कामगिरी गेल्या काही वर्षांत कशी राहिली ते पाहूयात. व्हॅल्यू रिसर्चनुसार गेल्या एका वर्षात सीपीएसई फंडाने या प्रकारातील इतर फंडाच्या तुलनेत चांगला परतावा दिलाय.सीपीएसईने गेल्या एक वर्षात, तीन वर्षात आणि पाच वर्षात अनुक्रमे 34 टक्के, 14 टक्के आणि 5 टक्के परतावा दिलाय.

या फंडात गुंतवणूक करावी का?

मात्र सीपीएसईमध्ये गुंतवणूक करावी की नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. थीमेटिक फंड एखाद्या संकल्पनेवर आधारित कंपनी किंवा सेक्टरची निवड करतात त्यामुळे थीमेटिक फंड कोणत्याही सेक्टोरल फंडापेक्षा अधिक व्यापक असतात. उदाहरणार्थ एखादा इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर थीम वाला फंड असल्यास फंडाद्वारे सीमेंट, ऊर्जा, स्टीलसारख्या क्षेत्रात गुंतवणूक केली जाते. मात्र, आर्थिक तज्ज्ञ थीमेटिक फंडाबाबत फारसे उत्साही नाहीत. बहुतेक वेळी नव्या गुंतवणूकदारांना थीमेटिक फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात येत नाही. मात्र,एखादा गुंतवणूकदार जोखिम समजून घेऊन गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूकदारांनी SIP द्वारे अशा प्रकारच्या फंडात कमीत कमी पाच वर्ष गुंतवणूक करावी, असा सल्ला CFP आणि Investography च्या फाउंडर श्वेता जैन यांनी दिलाय. एसेट क्लास म्हणून थीमेटिक फंडाकडे पाहिल्यास त्यात फारशी विविधता दिसून येत नाही. दीर्घ कालावधीत फारसा परतावा देखील नाही. त्यामुळे ज्यांना कमी कालावधीसाठी थीमेटिक फंडात गुंतवणूक करायची असल्यास त्यांनी SIP द्वारे गुंतवणूक करणं योग्य राहिल.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.