AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनला भस्म्या झालाय की काय? सोनंच खरेदी करत सुटलाय? ड्रॅगनला झालं तरी काय ?

जगातील अनेक देशांत सोने खरेदीची जणू स्पर्धा लागली आहे. एवढेच काय भारताचा शेजारील देश चीन जो स्वत: सोन्याच्या निर्मितीत जगातील नंबरवन देश आहे. त्या देशाने आता सोने खरेदीचा अक्षरश: सपाटा लावाला आहे.

चीनला भस्म्या झालाय की काय? सोनंच खरेदी करत सुटलाय? ड्रॅगनला झालं तरी काय ?
| Updated on: Feb 15, 2025 | 9:04 PM
Share

Gold Price : रशिया आणि युक्रेन युद्ध, इस्रायलचे गाझापट्टीतील हल्ले त्यातच अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेली टॅरीफ योजना याने यामुळे अस्थिर जागतिक परिस्थिती असल्याने प्रत्येक देश आपल्या सोन्याच्या भंडारात वाढ करीत आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने जारी केलेल्या माहीतीनुसार साल २०२३ मध्ये चीनने जगात सर्वाधिक 378.2 टन सोन्याचे उत्पादन केले होते. तरीही चीनने सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. काय आहे या अधाशीपणा मागचे कारण पाहूयात…

जगात जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता निर्माण होते. तेव्हा गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करीत असतात. चीनचे जनता देखील या ट्रेंडला फोलो करीत आहे. आणि मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करीत आहे. वास्तविक चीनमध्ये पारंपारिक गुंतवणूकीचे पर्याय म्हणून रिअल इस्टेट आणि स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु झाली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदाराचे मोठे नुकसान झाले आहे. अशात लोकांनी सोने खरेदीकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय चीनची केंद्रीय बँक देखील लागोपाठ आपल्या गोल्ड रिझर्व्हला वाढवत चालली आहे. आणि अमेरिकन कर्जरोखे (U.S. Treasury Bonds) खरेदी करण्यापासून लांब राहिली आहे.

गोल्ड मार्केटमध्ये चीनचा वाढता दबदबा

चीनचा आधीपासूनच सोन्याच्या बाजारात दबदबा आहे. एक मोठी ताकद म्हणून सोन्याकडे पाहीले जाते. परंतू या नव्या सोने खरेदीने चीनचा प्रभाव आणखीन वाढला आहे. साल २०२२ च्या अखेरपर्यंत सोन्याच्या किंमतीत सुमारे ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. वास्तविक सर्वसाधारणपणे जादा व्याज दरे आणि मजबूत अमेरिकन डॉलर सोन्याच्या किंमती कमी करीत असतो.परंतू यावेळी असे घडलेले नाही…

चीन अमेरिकन डॉलरचे अवलंबित्व कमी करतोय

चीन बऱ्याच काळापासून आपल्या रिझर्व्ह फंड्सला डाईव्हर्सिफाय करीत आहे आणि अमेरिकेच्या डॉलरवरील आपले अवलंबित्व कमी करत आहे. गेल्या एक दशकापासून चीनने अमेरिकन ट्रेझरी बॉण्डमध्ये आपली गुंतवणूक कमी केली आहे. यंदा चीन घरगुती चलनाच्या ऐवजी ( रॅन्मिन्बी ) विदेशी चलनाद्वारे सोने खरेदी करीत आहे. ज्याद्वारे चीन अमेरिकन डॉलर आणि अन्य विदेशी चलनावरील आपले अवलंबित्व कमी करीत आहे.

सोन्याची किंमत आणखी वाढणार का ?

चीनचे सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि सरकार दोघेही सोन्यात गुंतवणूक करीत आहेत. ज्यामुळे सोन्याची किंमत लागोपाठ वाढत चालली आहे. तज्ज्ञांच्या मते जर चीन याच वेगाने सोने खरेदी करीत राहीला तर सोन्याच्या किंमती जागतिक बाजारपेठेत आणखीन वाढू शकतील. तसेच असेही संकेत मिळत आहेत की चीन भविष्यात सोन्याला डॉलरला पर्यायाच्या रुपात वापर करण्याच्या तयारीत आहे. जर असे झाले तर अर्थव्यवस्थेत पुन्हा सोन्याला महत्व वाढणार आणि डॉलरची स्थिती कमजोर होऊ शकते.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.