AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारचा मोठा निर्णय ! पॅन आणि आधारसंबंधी नव्या इन्कम टॅक्स कायद्यात मोठा बदल, नियम जाणून घ्या

New Income Tax Bill 2025 मध्ये PAN ( परमानंट अकाऊंट नंबर ) आणि आधारकार्ड संबंधित अनेक नवे नियम या अर्थसंकल्पात आणले गेले आहेत. या नियमांचे पालन करदात्यांना करावे लागणार आहे. हे नियम कर वसुलीला अधिक पारदर्शक आणि डिजिटल बनविण्यासाठी केले आहेत.

सरकारचा मोठा निर्णय ! पॅन आणि आधारसंबंधी नव्या इन्कम टॅक्स कायद्यात मोठा बदल, नियम जाणून घ्या
Follow us
| Updated on: Feb 15, 2025 | 4:09 PM

New Income Tax Bill 2025  : केंद्र सरकारने नुकतेच आपला साल २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात आयकरदात्याच्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय झालेले आहेत. नवे इन्कम टॅक्स विधयेक २०२५ सादर करण्यात आले आहे. या करदात्यासाठी नवे नियम आणले असून संपूर्ण करवसुलीचे आता डिजिटलायझेशन होणार आहे. नवे नियम न पाळणाऱ्यांना आर्थिक भूर्दंड किंवा कायदेशीर कारवाईचा देखील सामना करावा लागू शकतो. नवा आयकर विधेयक २०२५ संसदेत सादर झाले आहे. करचोरी रोखणे आणि कर वसुली प्रशासनाचे डिजिटलीकरणकरण आणि त्यास मजबूत करणे आणि करवसुलीत अधिक पारदर्शकता वाढवणे हे या नव्या आयकर कायद्यामागचे उद्दिष्ट आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यांना दंड आणि कायदेशीर कारवाईचा सामना देखील करावा लागू शकतो

पॅन आणि आधारकार्ड यांना जोडणे बंधनकारक –

नव्या आयकर कायद्यानुसार आता प्रत्येक नागरिक ज्याला पॅनकार्ड मिळाले आहेत त्यांना आधारकार्ड मिळणे बंधनकार आहे. या नागरिकाला त्याचा आधारकार्ड क्रमांक आयकर विभागाला कळविले बंधनकारक केले आहे. जर नागरिकांनी असे केले जानाही तर त्याचे पॅनकार्ड निष्क्रीय होणार आहे.

निष्क्रीय पॅनकार्डचा उपयोग बँकिंग व्यवहार आणि आर्थिक देवणाघेवाण आणि टॅक्स फायलींग सारख्या कामांसाठी होणार नाही. आधारला पॅनकार्डचा पर्याय म्हणून वापर करण्याची सुविधा

हे सुद्धा वाचा

ज्या नागरिकांकडे पॅनकार्ड नाही त्यांना आपल्या आधारकार्डचा क्रमांवर वापरता येणार आहे.

या नागरिकांना नंतर एक परमानंट अकाऊंट नंबर ( PAN ) दिला जाणार आहे.

ज्या नागरिकांकडे आधी पासून पॅनकार्ड आहे. ते नागरिकही आता पॅनकार्डच्या ऐवजी आधारकार्डचा वापर करु शकतात. परंतू त्यांना आपला आधारकार्ड क्रमांक आधीच जाहीर केलेला असायला हवा.

एकाहून अधिक पॅनकार्ड बाळगणे गुन्हा –

एखाद्याकडे एकाहून अधिक पॅनकार्ड आहेत अशा व्यक्तीला मोठा दंड किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते

आर्थिक देवाण घेवाणीसाठी पॅनकार्ड किंवा आधारकार्ड अनिर्वाय असणार –

कोणत्याही नागरिकाला आयकर विभागाशी देवाणघेवाण करताना आपले पॅन किंवा आधारकार्ड सादर करावे लागेल

बँक खाते उघडताना ५० हजाराहून अधिक रोख रक्कम भरताना, अचल संपत्ती खरेदी करताना आणि प्रमुख आर्थिक घडामोडी करताना पॅनकार्ड किंवा आधारकार्ड आवश्यक असणार आहे.

संबधित प्राधिकरणांना पॅनकार्ड किंवा आधारकार्डची योग्य प्रकारे प्रमाणीकरण झाले आहे की नाही हे तपासावे लागणार आहे.

आधारशी PAN कार्ड न जोडले गेल्यास मोठा भुर्दंड बसणार –

जर नागरिकांना विहित मुदतीत पॅनकार्डशी आधारकार्ड लिंक केलेले नाही तर त्याला १००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच अशा पॅनकार्डला निष्क्रिय केले जाऊ शकते. त्यामुळे करदात्यांना आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.

चुकीची माहिती दिल्यास मोठा दंड –

जर कुठल्या व्यक्तीने चुकीचे आधारकार्ड किंवा पॅनकार्ड दिले असेल तर त्याला १०,००० रुपये प्रति उल्लंघन दंड होऊ शकतो. तसेच करचोरी किंवा फसवणूक प्रकरणात अधिक कठोर कारवाई होऊ शकते.

विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले.
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण.
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न..
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्....
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?.
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP.
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?.
क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल...कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा VIDEO
क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल...कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा VIDEO.