AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITR : आयटीआर भरताना कोणत्या चुका होऊ शकतात?, जाणून घ्या काय काळजी घ्यावी

आयटीआर (ITR) भरताना अनेक जण चुका करतात त्याचा फटका भविष्यात बसतो. आयटीआर फाइल करताना कोणत्या चुका करू नयेत हे आपण जाणून घेऊयात.

ITR : आयटीआर भरताना कोणत्या चुका होऊ शकतात?, जाणून घ्या काय काळजी घ्यावी
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 28, 2022 | 2:10 AM
Share

इन्कम टॅक्स (Income Tax) भरण्याची तारीख जवळ आली आहे. आतापर्यंत तुम्ही आयटीआर (ITR) दाखल केला नसेल तर सर्वात आधी हे काम पूर्ण करा. आयटीआर भरताना अनेक जण चुका करतात त्याचा फटका भविष्यात बसतो. आयटीआर फाइल करताना कोणत्या चुका करू नयेत हे आपण जाणून घेऊयात. योग्य आयटीआर फॉर्म निवडणं ही सर्वात महत्वाची बाब आहे. कोणता आयटीआर फॉर्म भरावा हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ उत्पन्नाचे साधन काय आहे ? कोणती निवासी मालमत्ता (property) आहे,परदेशातील मालमत्ता आणि एखाद्या कंपनीमध्ये भागीदार आहात काय ? यावर ITR चा कोणताफॉर्म भरायचा आहे? हे अवलंबून असते. उदा. ITR-1 पगार घेणाऱ्या व्यक्तींसाठी असतो. तसेच कोणत्याही व्यवसायमधून नफा किंवा कॅपिटल गेन करत असाल तर ITR-2 फॉर्म फाइल करावा लागतो.

माहिती अचूक द्या

ITR भरताना वैयक्तिक माहिती अचूक देणे गरजेचं आहे. चुकीची माहिती दिल्यास ITR फॉर्म रद्दबातल होऊ शकतो. रिफंडचा दावा करणाऱ्या करदात्यांनी आपल्या बँक खात्याची योग्य माहिती द्यावी. तसेच हे बँकेतील खातं प्री-व्हॅलिडेट असावं. IFSC कोड आणि बँक खात्याशी संबंधित अचूक माहिती न दिल्यास रिफंड मिळण्यास अडचणी येऊ शकतात.अनेक करदाते कर सवलतीद्वारे मिळणारे उत्पन्न ITR मध्ये दाखवत नाहीत, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेतून मिळणारे व्याज आणि नातेवाईकांकडून मिळणारी भेटी या सारख्या बाबी ITR मध्ये दाखवत नाहीत. कर प्राप्त उत्पन्नाची नोंद ITR फॉर्म मध्ये न दर्शवल्यास आयकर विभाग चौकशी करू शकते.

आयटीआर वेळेत भरा

शेवटची तारीख उलटून गेल्यानंतर ITR फाइल केल्यास दंड भरावा लागतो. 31 जुलै 2022 आधी ITR फाइल केल्यानंतर एखादी चूक आढळल्यास सुधारणा करण्याची संधी मिळते. मात्र, निर्धारित तारखेनंतर रिटर्न फाईन केल्यानंतर आयटीआरमधील चुकीत सुधारणात करता येत नाही . तारीख उलटून केल्यानंतर ITR फाईल केल्यास पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी करप्राप्त उत्पन्न असल्यास एक हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागते. पाच लाख रुपयांपेक्षा जास्त करप्राप्त उत्पन्न असेल तर 5 हजार रुपये विलंब शुल्क भरावा लागते.

चुकीची माहिती देऊ नका

ITR भरणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं महत्वाचं आयटीआर व्हेरिफाय करणं देखील तितकंच गरजेचं आहे. ITR व्हेरिफाय करण्यासाठी 120 दिवसांचा कालावधी असतो. हे काम आधार कार्डाच्या ओटीपीच्या माध्यमातून करता येतं. ऑनलाइन व्हेरीफीकेशन न झाल्यास ITR ची कॉपी सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट म्हणजेच सीपीयूला पाठवण्यात येते. जोपर्यंत आयटीआर व्हेरिफाय होत नाही तोपर्यंत आयटीआर रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. तुमचं उत्पन्न आयकरासाठी पात्र आहे आणि तुम्ही कर भरत नसाल किंवा खरं उत्पन्न दाखवत नसल्यास, तुम्ही कर चोरी केली आहे असं मानलं जातं. अशा वेळी आयकर अधिकाऱ्यांना दंडासोबतच न्यायालयात केस दाखल करण्याचा अधिकार असतो.या प्रकरणात दोषी आढळल्यास दंड आणि शिक्षा होऊ शकते.अशी माहिती कर तज्ज्ञ जितेंद्र सोळंकी यांनी दिलीये.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.