AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax Return | 3 वर्षात पहिल्यांदाच कर परताव्याची मुदत वाढवण्यास केंद्राचा नकार, काय आहेत कारणे जाणून घ्या

Income Tax Return News | प्राप्तीकर रिटर्न (ITR)भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 रोजी आहे. ही मुदत वाढवण्यास सरकार उत्सुक नाही. काय आहेत यामागची कारणे, जाणून घेऊयात

Income Tax Return | 3 वर्षात पहिल्यांदाच कर परताव्याची मुदत वाढवण्यास केंद्राचा नकार, काय आहेत कारणे जाणून घ्या
प्राप्तीकर रिटर्न भरला का?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 26, 2022 | 11:39 AM
Share

Income Tax Return | प्राप्तीकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 रोजी संपत आहे हे एव्हाना ऐकून तुमचं डोकं भनभनलं असेल. इतक्या दिवसांपासून याच बातम्या समोर येत आहेत. या बातम्या अर्थातच तुमच्या भल्यासाठीच देण्यात आल्यात. या बातम्यांनी तुमचं होणारं नुकसान टळलं. पण नेहमीसारखं सरकार अंतिम तारीख (Last Date) वाढवतं हा अतिआत्मविश्वास काही जणांना नडला. त्यांना त्याचा फटका बसणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. गेल्या दोन आर्थिक वर्षांत, कोविड -19 (Covid-19) साथीच्या रोगाशी लढा देत असलेल्या करदात्यांना सरकारने दिलासा दिला होता. सरकारने आयटीआर (ITR)दाखल करण्याची अंतिम मुदत वाढविली होती. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. यावेळी कुठलेही मानवी संकट आलेले नाही. त्यामुळे केंद्र सरकार आयटीआरची मुदत वाढविण्याच्या विचारात नाही. त्यामुळे फाजील आत्मविश्वासाला सोडा आणि मुदतीच्या आत आयकर रिटर्न भरा. त्यानंतर तुम्हाला दंडासहित इतर कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

काय म्हणाले महसूल सचिव

प्राप्तीकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 रोजी संपत आहे. पण गेल्या काही वर्षात सरकारने अंतिम मुदत वाढवली होती. त्यावेळी कारणं वेगळी होती. त्यावेळी जागतिक मानवी संकट ओढावले होते. यंदा मात्र कोणतेही मोठे कारण नाही. त्यामुळे सरकार प्राप्तीकर रिटर्न दाखल करण्यासाठी अंतिम तारखेत मुदत वाढ देण्याच्या विचारात नसल्याचे महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले.

हे 5 ठळक मुद्दे ही घ्या लक्षात

प्राप्तीकर खात्याच्या (ITD) नियमांनुसार, वैयक्तिक करदात्यांनी – ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नसते. त्यांना आर्थिक वर्षाचा आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत पुढील आर्थिक वर्षाच्या 31 जुलै पर्यंत आहे.

आता कराचा भरणा सोपे झाले आहे आणि परतावा ही गतीने मिळत आहे. प्राप्ती कर खात्याने कर भरणा करणे सोपे व्हावे यासाठी नवीन आय-टी फायलिंग पोर्टल सुरु केले आहे. त्यामुळे वाढीव भार टळला आहे. महसूल सचिव तरुण बजाज यांनी करदात्यांचा अभिप्राय चांगला असल्याचे सांगितले.

गेल्या वेळी, प्राप्तीकर खात्याकडे 50 लाखांपेक्षा जास्त लोकांनी कराचा (शेवटच्या तारखेला रिटर्न भरणे) भरणा केला होते. यंदा शेवटच्या तारखेला 1 कोटी करदात्यांसाठी आमची तयारी झाली आहे. त्यामुळे यंदा लोकांना अडचण येणार नाही असे बजाज यांनी सांगितले.

गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 (Fiscal Year 2021) मध्ये 31 डिसेंबर 2021 च्या वाढीव देय तारखेपर्यंत सुमारे 5.89 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. आयटीआरच्या माध्यमातून एखादी व्यक्ती भारताच्या आयकर विभागाकडे सादर करायची असते. त्यात त्या व्यक्तीचे उत्पन्न आणि त्यावर विशिष्ट आर्थिक वर्षात भराव्या लागणाऱ्या करांची माहिती देण्यात येते.

जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न सूट दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर त्याने कर परतावा भरणे आवश्यक आहे. नव्या करप्रणालीनुसार सवलतीची मर्यादा अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वीच्या नियमानुसार 60 वर्षांखालील व्यक्तींना अडीच लाख रुपये सूट मर्यादा आहे. 60 ते 80 वयोगटातील (Senior Citizen)साठी 3 लाख रुपये आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या (Super Senior Citizen) साठी 5 लाख रुपयांची सूट मर्यादा आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.