Cyrus Mistry | रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात काय होता वाद..

| Updated on: Sep 04, 2022 | 5:20 PM

Cyrus Mistry | रतन टाटा यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून सायरस मिस्त्री यांची निवड केली होती. पण नंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली. काय होता हा वाद जाणून घेऊयात.

Cyrus Mistry | रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात काय होता वाद..
वादाच्या वेदना
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

मुंबई- टाटा उद्योगसमुहाची (Tata Group) सामाजिक बांधिलकीसाठी मोठी ओळख आहे. जमशेदजी टाटा यांच्यापासून रतन टाटा यांच्यापर्यंत या सगळ्या दिग्गज टाटा समुहाच्या अध्यक्षांची नेहमीच चर्चा होती. रतन टाटा (Ratan Tata) यांनी त्यांचा उत्तराधि्कारी म्हणून सायरस मिस्त्री यांची निवड केली होती. त्यानंतर चार ते साडेचार वर्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry ) यांनी टाटा समुहाचे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर मात्र बोर्टाने ठराव करुन त्यांची अध्यक्षपदावरुन उचलबांगडी केली होती. त्यानंतर रतन टाटा यांनी पुन्हा एकदा टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वतःकडे घेतली होती. ही बाब त्यावेळी गंभीर समजली गेली. टाटा समुहातील हा वाद ऐतिहासिक ठरला होता. या प्रकरणाची कोर्टातही सुनावणी झाली होती. या दोघांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांर मतभेद झाले होते. हे जाणून घेऊयात.

1 निवडणूक निधी

रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात मतभेदाचा प्रमुख मुद्दा होता तो निवडणूक निधीचा. ओडिशाच्या 2014 च्या विधानमसभा निवडमुकांत सायरस मिस्त्री यांनी 10 कोटी गुंतवावेत असे त्यांच्या सल्लागाराने सुचवले होते. ओडिशात टाटांच्या मालकीची लोखडांची खाण असणे हे त्यामागचे कारण होते.

2. मंडळाचा विरोध

या विचाराला टाटा सन्सच्या संचालक मंडळआतील सदस्यांनी तीव्र विरोध केला होता. टाटा केवळ संसदीय निवडमुकीत गुंतवणूक करते असा या संस्थएचा अलिखित नियम होता. त्यामुळे मिस्त्री यांचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. मात्र मिस्त्री यांच्या मनात हा विचार आला, यामुळे रतन टाटा व्यथित झाले होते. ही मतभेदाची सुरुवात मानण्यात येते.

हे सुद्धा वाचा

3. लष्कराचे कंत्राट

2600 लष्करांच्या वाहनांसाठी 60 हजार कोटींची तरतूद करण्याचा निर्णय ही वादात अडकला. त्यावरुनही वाद झाला.

4. ओडिशा निवडणुकीवरुन वाद

2014 साली ओडिशा विधानसभा निवडणुकीत 10 कोटी रुपयांचा निधी देण्यावरुन वाद झाला. सायरस मिस्त्री यांना हा निधी द्यायचा होता. तर संचालक मंडळाचा त्याला विरोध होता. ओडिशातील लोखंड खाणीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते.

5. टाटा-वेलस्पन डील

टाटा-वेलस्पन डील सायरस मिस्त्री यांनी केली. पण त्याची माहिती टाटा सन्सच्या बोर्डाला दिली नाही. डील खूप मोठी असतानाही त्याची माहिती न दिल्याने रतन टाटा आणि सायरस यांच्यात दुरावा वाढला.

6. अमेरिकन कंपनीवरुन वादंग

अमेरिकन फास्ट फूड कंपनी लिटिल कॅसर्स सोबत सहयोगावरुन वादंग पेटले. हा निर्णय ही सायरस मिस्त्री यांनी परस्पर घेतल्याचा आरोप टाटा सन्सच्या बोर्डाने केला होता. यामुळे कंपनीची प्रतिमा डागळत असल्याचे संचालकांचे म्हणणे होते.

7. डोकोमोवरुन हायकोर्टात

असाच वाद टाटा आणि डोकोमोमध्ये झाला. हा वाद तर पुढे हायकोर्टात गेला. त्यामुळे दोघातील दुरावा वाढला.

8. चार दिवसांपूर्वी वाद

आता चार दिवसांपूर्वी टाटा समुहाची कंपनी टाटा सन्सच्या बोर्डची बैठक झाली. त्यातही सायरस मिस्त्री यांच्या शापूरजी पलोंजी ग्रुप (SP Group) आणि टाटा समुहात (Tata Group) वाद झाला.

9. ठराव मिस्त्रींच्या विरोधात

संचालक नियुक्तीवरुन हा वाद झाला. एसपी ग्रुपचे टाटा सन्समध्ये 18.4 टक्के हिस्सेदारी आहे. त्यांनी दोन संचालकांच्या नियुक्तीला विरोध केला. पण त्यांचा टक्का कमी असल्याने बहुमताने संचालक निवडीचा ठराव पास झाला.