AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp वर ईपीएफओची सेवा; PF खात्यातील शिल्लक रक्कम अशी तपासा

EPFO ​​Service on WhatsApp: अनेकदा पीएफमध्ये किती रक्कम शिल्लक आहे हे तपासण्यासाठी सारखी कसरत करावी लागते. कधी UAN विसरतो तर कधी ओटीपी चुकीचा टाकल्या जातो. आता या सर्व झंझटीपासून सुटका होणार आहे. ईपीएफओने व्हॉट्सॲप सेवा सुरू केली आहे.

WhatsApp वर ईपीएफओची सेवा; PF खात्यातील शिल्लक रक्कम अशी तपासा
ईपीएफओची व्हॉट्सॲप सेवाImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 21, 2026 | 3:28 PM
Share

WhatsApp EPFO ​​Service: अनेकदा नोकरदार वर्गाला पीएफ (PF) खात्यात किती रक्कम शिल्लक आहे आणि क्लेम स्टेटस तपासण्यासाठी वेळ लागतो. पीएफ बँलेन्स तपासण्यासाठी सर्वात अगोदर ईपीएफओच्या संकेतस्थळावर लॉगिन करावे लागते. पण Universal Account Number-UAN आठवत नाही अथवा इतर अडचणी येतात. त्यामुळे अनेक जण या फंदात पडत नाहीत. आता यावर केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने-ईपीएफओने एक तोडगा काढला आहे. त्यानुसार, अवघ्या एका क्लिकवर ईपीएफओ सदस्यांना त्यांचे पीएफ बँलेन्स आणि व्यवहाराची संपूर्ण माहिती व्हॉट्सॲपवर मिळेल.

काय आहे ही सुविधा?

या नवीन सुविधेत लोक अवघ्या काही सेकंदात त्यांच्या पीएफ खात्याची माहिती घेऊ शकतील. ही सुविधा स्थानिक भाषेत असेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना व्हॉट्सॲपवर सेवेचा लाभ घेता येईल. केंद्र सरकार ईपीएफओच्या सेवांचे डिजिटलीकरण करत आहे. डिजिटल सेवा अधिक सरळ आणि झटपट मिळणार आहे. त्यात व्हॉट्सॲपची सेवा सुरू करण्यात येणार आहे. ईपीएफओ हे कामगार आणि रोजगार मंत्रालयातंर्गत काम करते. लवकरच ईपीएफओ सदस्यांसाठी युपीआय आणि एटीएम सुविधा सुरू करणार आहे.

WhatsApp वर कसा तपासणार पीएफ बॅलेन्स?

व्हॉट्सॲप सेवा बहाल करण्यासाठी ईपीएफओ एक अधिकृत क्रमांक जाहीर करणार आहे. त्या क्रमांकावर हाय पाठवल्यावर ईपीएफओच्या सेवा सदस्यांना मिळतील.

1. सर्वात अगोदर ईपीएफओच्या अधिकृत क्रमांकावर Hello, Hi असा मॅसेज करावा लागेल

2. त्यानंतर ईपीएफओची सिस्टिम युझर्सचा मोबाईल क्रमांकाची पडताळणी करेल.

3. व्हॉट्सॲपवर युझर्सला पर्याय निवडावा लागेल. पीएफ संदर्भात काय माहिती हवी ते सांगावे लागेल

4. पीएफ संदर्भातील माहिती या ठिकाणी देण्यात येईल

या सुविधेच्या माध्यमातून पीएफ बॅलेन्सची माहिती मिळवता येईल. तर मागील 5 व्यवहारांचा तपशील पाहता येईल. या ठिकाणी क्लेम स्टेटची माहिती मिळेल. तर खात्यात किती पैसा शिल्लक आहे आणि किती रक्कम काढता येईल याचीही माहिती मिळेल. ही सर्व माहिती व्हॉट्सॲपवर सहज मिळेल. अर्थात ही सुविधा स्मार्टफोनवरच अवलंबून असतील. सध्या काही जण पीएफ संबंधी माहिती मिळवण्यासाठी मिस्डकॉलचा वापर करतात. अथवा उमंग ॲपचा वापर करतात. व्हॉट्सॲपवर पीएफ संबंधी माहिती घेण्यासाठी केवळ ईपीएफओच्या (EPFO) अधिकृत क्रमांकाचाच वापर करावा लागेल. तसेच या सेवेचा ओटीपी आणि पासवर्ड अशी माहिती कुणालाही शेअर करू नका.

Follow Us
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या, व्हिडिओवर नेटकरी फिदा
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
Roha Accident | खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...