AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

D Mart : डी-मार्टमध्ये कोणत्या दिवशी गेल्यास मिळतो फ्रेश स्टॉक ? ताजा माल, जास्त व्हरायटी हवी असेल तर हा दिवस विसरू नका !

बहुतांश लोकं हे डीमार्टमध्ये खरेदी करायला जातात, पण तिथे चांगला, ताजा, फ्रेश ,स्टॉक कधी येतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? स्मार्ट खरेदी करायची म्हणजे फक्त पैसे वाचवणे नव्हे, तर चांगला, नवा, ताजा, एक्स्पायर न झालेली वस्तू विकत घेणंही आलं. तुम्हालाही हवा असेल फ्रेश स्टॉक, तर हे नक्की वाचा.

D Mart : डी-मार्टमध्ये कोणत्या दिवशी गेल्यास मिळतो फ्रेश स्टॉक ? ताजा माल, जास्त व्हरायटी हवी असेल तर हा दिवस विसरू नका !
| Updated on: Oct 05, 2026 | 5:20 PM
Share

मुंबईसह देशभरातील अनेक शहरांमध्ये शाखा असलेलं DMart हे ग्राहकांच्या आवडीचं शॉपिंग डेस्टिनेशन आहे. किराणा सामानापासून घरगुती वस्तू, कपडे, किचन प्रॉडक्ट्स आणि वैयक्तिक वापराच्या वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात डीमार्टमध्ये खरेदी करतात. बाहेरपेक्षा थोड्या स्वस्त, ऑफर्समध्ये असलेल्या आणि तुलनेने परवडणाऱ्या किमती हे देखील डीमार्टच्या लोकप्रियतेमागील एक कारण मानलं जातं. मात्र डीमार्टमध्ये नियमित खरेदी करणाऱ्याही अनेक ग्राहकांना एक महत्त्वाची गोष्ट माहीत नसते. स्टोअरमध्ये नवीन स्टॉक नेमका कधी येतो आणि फ्रेश स्टॉकसाठी कोणत्या दिवशी खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते ? हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. तुम्हालाही फ्रेश स्टॉक घ्यायचा आहे का? चला, जाणून घेऊया सविस्तर..

डीमार्टमध्ये नवीन स्टॉक कधी येतो ?

रिटेल क्षेत्रातील उपलब्ध माहितीनुसार, डीमार्टच्या स्टोअरमध्ये दररोज नवीन माल पोहोचत असतो. ग्राहकांची गर्दी कमी असलेल्या वेळेत स्टॉकची डिलिव्हरी केली जाते. त्यामुळे दिवसभरातील विक्रीवर परिणाम न होता कर्मचारी नवीन माल शेल्फवर व्यवस्थित मांडू शकतात. साधारणपणे रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत नवीन माल स्टोअरमध्ये पोहोचवला जात असल्याचे सांगितलं जातं. या कालावधीत कर्मचारी विविध विभागांतील उत्पादने शेल्फवर मांडण्याचे काम करतात. त्यामुळे सकाळी स्टोअर उघडल्यानंतर ग्राहकांना नवीन स्टॉक उपलब्ध होण्याची शक्यता अधिक असते.

सोमवार ते बुधवारचा काळ महत्त्वाचा

आठवड्याच्या शेवटी ग्राहकांची मोठी गर्दी आणि विक्री झाल्यानंतर अनेक उत्पादनांचे स्टॉक कमी होतात. त्यामुळे सोमवार ते बुधवार या काळात रिकामे झालेले शेल्फ पुन्हा भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात केली जाते. या काळात किराणा सामान, घरगुती वस्तू, कपडे, किचन प्रॉडक्ट्स, पर्सनल केअर वस्तू यांसह विविध विभागांमध्ये नवीन माल उपलब्ध होऊ शकतो.

मग गुरुवारी डीमार्टला जाणे फायदेशीर ?

सोमवार ते बुधवारदरम्यान मोठ्या प्रमाणात शेल्फ रिफिल केले जात असल्याने, गुरुवारी गेल्यास नवीन स्टॉक आणि उत्पादनांची अधिक व्हरायटी मिळण्याची शक्यता असते. विशेषतः एखाद्या विशिष्ट ब्रँडचे किंवा उत्पादनाचे पर्याय पाहायचे असतील, तर आठवड्याच्या सुरुवातीला किंवा त्यानंतरच्या दिवसांत स्टोअरला भेट देणे काही ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

फक्त नियमित ब्रँडच नाही, नवीन उत्पादनंही

नवीन स्टॉकमध्ये प्रसिद्ध ब्रँडच्या उत्पादनांसोबतच डीमार्टच्या स्वतःच्या ब्रँडची उत्पादने देखील उपलब्ध केली जातात. याशिवाय काही हंगामी उत्पादने, नवीन लॉन्च झालेल्या वस्तू आणि विशेष ऑफर्सशी संबंधित स्टॉकही वेळोवेळी स्टोअरमध्ये येत असतो. त्यामुळे नवीन आलेल्या वस्तू किंवा जास्त पर्यायांमधून खरेदी करायची असल्यास आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये डीमार्टला भेट देणे उपयोगी ठरू शकतं.

प्रत्येक स्टोअरचं वेगळं असू शकतं वेळापत्रक

पण, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. डीमार्टच्या प्रत्येक स्टोअरमध्ये स्टॉक येण्याची आणि शेल्फ भरण्याची वेळ एकसारखी असेलच असे नाही. स्थानिक मागणी, विक्रीचे प्रमाण, स्टोअरचा आकार आणि उपलब्ध स्टॉक यानुसार वेळापत्रक बदलू शकते.

एकंदरीत बघितलं तर, डीमार्टमध्ये नवीन स्टॉक नियमितपणे येत असतो आणि तो प्रामुख्याने रात्री किंवा पहाटे शेल्फवर मांडला जातो. सोमवार ते बुधवारदरम्यान स्टॉक रिफिल होण्याचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असल्याने, गुरुवारी खरेदी केल्यास तुलनेने अधिक पर्याय मिळू शकतात. मात्र एखाद्या विशिष्ट प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्हाला डीमार्टला जायचं असेल तर, संबंधित स्टोअरमध्येते उपलब्ध आहे की नाही, ते आधी तपासणे अधिक योग्य ठरतं. कारण फ्रेश स्टॉकचा दिवस आणि वेळ स्टोअरनुसार बदलू शकतो.

Follow Us
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
'राऊतांना मोदींवर टीका करण्याचा अधिकार नाही', परिणय फुकेंचं वक्तव्य
Video :
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न, विरोध मागे घेऊन प्रचारात सक्रिय
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ