AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Interest Rates on Loans : महागड्या कर्जापासून कधी मिळेल मुक्ती, आरबीआय गव्हर्नर यांनी स्पष्टच सांगितले

Interest Rates on Loans : महागाई आणि वाढत्या व्याजाने जनता मेटाकूटीला आली असताना, यापासून कधी मुक्ती मिळेल?

Interest Rates on Loans : महागड्या कर्जापासून कधी मिळेल मुक्ती, आरबीआय गव्हर्नर यांनी स्पष्टच सांगितले
कर्जाचा बोजा कधी होणार कमी
| Updated on: Jan 15, 2023 | 7:50 PM
Share

नवी दिल्ली : जनतेला महागाईपासून (Inflation) सूटका करुन घ्यायची आहे. तर महागड्या कर्जापासून (Expensive Loans) ही त्यांना मुक्ती हवी आहे. कर्जावरील वाढलेल्या व्याजदरांमुळे कर्जदार हैराण आहेत. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यावरील व्याजदरात मोठी वाढ झाली आहे. व्याजदर (Interest Rates) कमी होण्यासाठी कर्जदारांनी देव पाण्यात ठेवले आहे. किरकोळ महागाई घटली असताना आता व्याजदर कपातीची मागणी जोर धरत आहे. वाढत्या महागाई दराविषयी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी काय संकेत दिले. त्यांनी महत्वाचा इशारा दिला आहे.

गेल्या वर्षभरापासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु आहे. नवीन वर्षातही दोन्ही देशात घमासान सुरु आहे. परंतु, त्याचा परिमाण जागतिक अर्थव्यवस्थांवर होत आहे. अनेक देशात महागाई वाढली आहे. तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे हे युद्ध लवकर संपवावे असे आवाहन जागतिक समुदायाने केले आहे.

रशिया आणि युक्रेन युद्ध जर लांबले तर मात्र याचा फटका भारतीय कर्जदारांना बसणार आहे. दास यांच्या मते, या दोन्ही देशातील युद्ध लवकर न संपल्यास व्याजदरात कपात होणार नाही. ग्राहकांना वाढलेल्या व्याजदरानेच कर्ज फेडावे लागेल. त्यात त्यांना कोणताच दिलासा मिळणार नाही.

व्याजदर निश्चित करण्यासंबंधी चलनविषयक धोरण समितीची आढावा बैठक (MPC Meeting) होते. ही बैठक तीन महिन्यांनी फेब्रुवारीत होत आहे. भूराजकीय तणाव कायम राहिल्यास उच्च व्याजदरानेच ग्राहकांना कर्जाची परतफेड करावी लागेल, असे दास यांनी स्पष्ट केले. केवळ भारतीयच नाही तर अमेरिकेतील ग्राहकांनाही हाच नियम लागू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संकट आले की दुसरा पर्याय शोधण्यात येतो. सध्या जगात सप्लाई चेनमध्ये सुधारणा होत आहे. त्याचा परिणाम महागाई कमी होण्यास होईल. जगातील अनेक देशांनी पर्याय शोधल्याने सप्लाई चेनमध्ये सुधारणा होत असल्याने महागाईत घट होण्याचा दावा करण्यात येत आहे.

सहा महिन्यांपूर्वी युरोपियन युनियन आणि अमेरिकेत मंदी येण्याचा दावा करण्यात येत होता. पण आता परिस्थितीत सुधारणा होत आहे. फेडरल रिझर्व्हनेपण वाढीव व्याजदराचे आक्रमक धोरण कमी केले आहे. पण येत्या काही महिन्यात व्याजदर कपातीचा दिलासा मिळणे अवघड असल्याचे दास यांचे म्हणणे आहे.

गेल्यावेळी झालेल्या व्याजदरातील वाढीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. महागाई आटोक्यात येण्यासाठी 7-8 महिने लागू शकतात. वस्तूंच्या किंमती वाढल्या की महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदरात वाढ करावी लागते, असे दास यांनी स्पष्ट केले. पण येत्या काही दिवसांत महागड्या कर्जापासून सूटका होणार नाही, हे निश्चित आहे.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.