Home Loan : बँका देतात 5 प्रकारचे गृहकर्ज, कोणत्या वेळी, कोणते कर्ज घेणे ठरेल फायद्याचे

Home Loan : गृहकर्जाचे पाच प्रकार असतात, त्याचा उपयोग असा होतो.

Home Loan : बँका देतात 5 प्रकारचे गृहकर्ज, कोणत्या वेळी, कोणते कर्ज घेणे ठरेल फायद्याचे
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 10:34 PM

नवी दिल्ली : घराचे स्वप्न साकारण्यासाठी आपण बँकेकडून (Bank) कर्ज घेतो. घर खरेदीसाठी हे गृहकर्ज (Home Loan) घेण्याचा ट्रेंड जुना आहे. पण बँका 5 प्रकारचे गृहकर्ज देतात, हे अनेकांना माहिती नाही. तर या गृहकर्जांमध्ये फरक असतो. त्याचे फायदेही वेगळे असतात. अर्थतज्ज्ञांच्या मते वेगवेगळ्या गृहकर्जाचा फायदा होतात. तुमच्या आवश्यकतेनुसार गृहकर्जाचा पर्याय निवडता येतो. त्यामाध्यमातून चांगली बचत (Saving) करता येते. या पाच प्रकारच्या गृहकर्जाने अनेकांना दिलासा दिला आहे.

घर बांधण्यासाठी गृहकर्ज घेण्यात येते. ज्यांना घर बांधायचे असते, त्यांना घर बांधण्यासाठीचे कर्ज घेता येते. यामध्ये भूखंडाच्या किंमतीसह घर बांधण्याचा खर्चही समाविष्ट असतो. प्लॉटची किंमत यामध्ये तेव्हाच समाविष्ट होते, जेव्हा एक वर्षांच्या आतच त्यावर कर्ज घेण्यात येते.

नवीन सदनिका वा घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतल्यास त्याला घर खरेदी कर्ज असे म्हणतात. जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करत असाल तर बँक तुम्हाला 90 टक्के कर्ज मिळवून देते. बँकेकडून 80 टक्के कर्ज तर सहज मिळते. या कर्जाचा कालावधी 20 ते 30 वर्षांकरीता असतो.

हे सुद्धा वाचा

तुमचे टुमदार घर असेल. पण हे घर मोठे करायचे असेल. अथवा घराच्या गच्चीवर दुसरा मजला वाढवायचा असेल. घराचा विस्तार करायचा असेल तर हे कर्ज उपयोगी पडते. या कर्जाला होम एक्सटेंशन लोन असे म्हणतात.

घर बांधल्याच्या काही वर्षानंतर कधी कधी घराच्या दुरुस्तीची गरज पडते. अशावेळी हे कर्ज उपयोगी पडते. या कर्जात घराची दुरुस्ती, त्याचे रंगकाम, नुतनीकरणाचा खर्च, यासाठी बँकेकडून कर्ज मिळते. बँका त्यासाठी होम इम्प्रुवमेंट लोन देतात.

ब्रिज होम लोन हा पण एक प्रकार आहे. यामध्ये मालक नवीन मालमत्ता खरेदी करेपर्यंत सध्याच्या घराची विक्री करत नाही, तोपर्यंत हे कर्ज देण्यात येते. ब्रिज होम लोन हे कमी कालावधीसाठी देण्यात येते. बँक जास्तीत जास्त दोन वर्षांकरीता हे कर्ज देते.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.