मालमत्तेत गुंतवणूक कुठे ठरणार फायदेशीर ? बंगळुरु, मुंबई, दिल्ली कि चेन्नई ? कुठे मिळणार जादा परतावा पाहा
देशातील मालमत्तांचे दर प्रचंड वाढले आहेत. दिल्ली आणि मुंबईत एकीकडे मालमत्तांचा दर प्रचंड आहे. तर घरभाडे दिल्याने होणारा फायदा मात्र मुंबई आणि दिल्ली पेक्षा दक्षिणेतील सिलीकॉन व्हॅलीत आहे.

स्वत:चे घर खरेदी करणे आजच्या काळात सर्वात महागडा व्यवहार आहे. महानगरात जमीन आणि घरांचे भाव आकाशाला भिडले आहेत.गेल्या चार वर्षात घरांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. एका अहवालानूसार साल 2020 ते 2024 पर्यंत देशातील प्रमुख शहरात प्रॉपर्टीच्या किंमतीत 9.3 कंपाऊंट अन्युएल ग्रोथ रेट किंवा CAGR मध्ये वाढ झाली आहे. तर घरगुती उत्पन्नात 5.4 टक्के इतक्या धीमी गतीने वाढ झाली आहे. कोणत्या महानगरात प्रॉपर्टीच्या किंमतीत सलग वाढ होत आहे आणि कुठे गुंतवणूक केल्यास मिळेल तगडा फायदा पाहूयात…
या शहरात सर्वात स्वस्त प्रॉपर्टी
मॅजिक ब्रिक्सच्या रिपोर्टप्रमाणे साल 2024 मध्ये सर्वात स्वस्त घरांच्या शहराच्या यादीत चेन्नई, अहमदाबाद आणि कोलकाता टॉपवर आहेत. ही शहरं भारताच्या टॉप-10 प्रॉपर्टी मार्केट्समध्ये सर्वात कमी प्राईस टू इन्कम ( P/I ) रेषोवाले आहेत. रिअल इस्टेटमध्ये व्हॅल्युएशनसाठी ही प्रोसेस लागू होते. उच्च पीआय म्हणजे प्रॉपर्टीचे दर अधिक आहेत. तर कमी पीआयचा अर्थ स्वस्त असा आहे. याविरुद्ध मुंबई आणि दिल्लीत महागड्या घरांच्या यादीत सर्वात वर आहेत.
दिल्ली आणि मुंबई महागडी
मुंबई महानगर क्षेत्र ( MMR ) आणि दिल्ली सर्वात महागड्या प्रॉपर्टीसाठी ओळखली जात आहेत. येथील मालमत्ता दर घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत खूपच जादा आहेत. साल 2020 ते 2024 दरम्यान देशातील प्रमुख महानगरात प्रॉपर्टीच्या किंमती 9.3 टक्क्यांच्या CAGR ने वाढल्या आहेत. तर घरगुती उत्पन्नात 5.4 टक्के धीमी गतीने वाढ झाली आहे. पी/आय प्रमाण 2020 मध्ये 6.6 ने वाढून 2024 मध्ये 7.5 झाले आहे. जो एक बेंचमार्क 5 च्या वर आहे. मुंबई आणि दिल्लीचा विचार करता येथील रेषो क्रमश:14.3 आणि 10.1 आहे. जो या क्षेत्रात अधिक गुंतवणूकीचा संकेत देतो.
बंगळुरुमध्ये सर्वाधिक भाड्यात वाढ
भारतातील टॉप शहरात घरांच्या भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ पाहाता, साल 2023 मध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, ही वाढ साल 2024 मध्येही वाढत आहे. बिझनेस टुडेमध्ये प्रकाशित एका बातमीनूसार भारताची सिलीकॉन व्हॅली म्हटली जाणाऱ्या बंगळुरु येथे सर्वाधिक घरभाड्यात वाढ झाली आहे. बंगळुरुच्या काही विभागात घरभाडे दरात 40 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सरजापूर रोड विभागात 2 BHK अपार्टमेंटचे Q4 2023 मध्ये 31,600 रुपये असलेले भाडे Q1 2024 मध्ये 34,000 रुपये झाले. याच धर्तीवर व्हाईटफील्डमध्ये याच काळात भाडे 30,200 रुपयाहून 32,500 रुपयांपर्यंत वाढले आहे.
येथे घर भाड्याने देणे फायद्याचे
बेंगलुरुमध्ये मालमत्तांच्या भाडेदरात वाढ झालेली नाही , तर मुंबई आणि उत्तरेकडील गुरुग्रामसारख्या परिसरात देखील घरभाड्यात वाढ झाली आहे, ज्यात मुंबईत 4.15% आणि गुरुग्राममध्ये याच अवधी 4.1% टक्के वाढ झाली आहे. यामुळे हे स्पष्ट आहे की कोरोना काळानंतर पुन्हा एकदा आयटी केंद्रीत शहरातील मागणीत वाढ झाली आहे. प्रॉपर्टी भाड्याने देण्यामुळे चांगला फायदा होत आहे. अन्य शहरात देखील भाडेदरात वाढ झाली आहे. नोएडा सेक्टर 150 आणि दिल्लीतील द्वारकामध्ये भाडे क्रमश: 9% आणि 6% वाढले आहे.तर मुंबईच्या चेंबूर आणि मुलुंड मध्ये 4%, कोलकाताच्या राजारहाट मध्ये केवळ 3% आणि चेन्नई तसेच हैदराबादमध्ये क्रमशः 4% आणि 5% मालमत्तेच्या भाड्यात वाढ झालेली आहे.
