भारतातील सर्वोत्कृष्ट बँक कोणती? जाणून घ्या टॉप 10 बँकांची यादी

फोर्ब्सच्या या यादीनुसार भारतातील पहिल्या 10 बँकांवर कोणत्या आहेत, त्या यादीवर एकदा नजर टाकूया. (Top Forbes' 'World's Best Banks' list in India)

भारतातील सर्वोत्कृष्ट बँक कोणती? जाणून घ्या टॉप 10 बँकांची यादी
sbi

मुंबई : फोर्ब्सने नुकतंच स्टेटिस्टा या बाजार संशोधन संस्थेसोबत मिळून ‘जगातील सर्वोत्कृष्ट बँकांची’ यादीची तिसरी आवृत्ती जाहीर केली आहे. हा अहवाल जगभरातील 43,000 अधिक बँकिंग ग्राहकांच्या सध्याच्या आणि मागील बँकिंग संबंधांच्या पाहणीवर आधारित आहे. फोर्ब्सच्या मते, कोणत्याही बँकेचे वर्गीकरण हे ग्राहकांचे समाधान आणि त्याच्या प्रमुख वैशिष्ट्यांच्या आधारावर केली जातात. फोर्ब्सच्या या यादीनुसार भारतातील पहिल्या 10 बँकांवर कोणत्या आहेत, त्या यादीवर एकदा नजर टाकूया. (Top Forbes’ ‘World’s Best Banks’ list in India)

ग्राहकांच्या गरजा भागवण्यासाठी धडपड करु – डीबीएस 

फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, डीबीएस ही बँक सलग दुसर्‍या वर्षी भारतातील 30 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सलग दुसर्‍या वर्षी जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट बँकांच्या यादीत आमच्या बँकेचा समावेश झाला आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया डीबीएस बँक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरोजित शोम यांनी दिली.

गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही एक मजबूत ग्राहक-केंद्रीत मताधिकार तयार केला आहे. जागतिक संकटाच्या काळात ग्राहकांना यामुळे आधार मिळाला आहे. आम्ही आमच्या ग्राहकांशी असलेले आपले नाते आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत राहू. तसेच त्यांच्या प्रत्येक गरजा भागवण्यासाठी धडपड करु, असेही सुरोजित शोम म्हणाले.

🛑टॉप 10 बँकांची यादी

💠डीबीएस बँक
💠सीएसबी बँक
💠आयसीआयसीआय बँक
💠एचडीएफसी बँक
💠कोटक महिंद्रा बँक
💠अॅक्सिस बँक
💠स्टेट बँक ऑफ इंडिया
💠फेडरल बँक
💠सारस्वत बँक
💠स्टँडर्ड चार्टर्ड बँक

कारण काय?

डीबीएस इंडिया ही बँक बर्‍याच बाबींमध्ये उत्कृष्ट आहे. डीबीएस बँकेबद्दल सामान्य स्तरावर आणि ग्राहकांवर खूप चांगला प्रभाव आहे. या घटकांमुळे डीबीएसला भारतातील पहिला क्रमांक कायम राखण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी डीबीएस बँक इंडियाला एशिया मनीतर्फे ‘इंडियाज बेस्ट इंटरनॅशनल बँक 2021′ या पुरस्कराने गौरवण्यात आले होते. तर 2020 मध्ये न्यूयॉर्कस्थित ग्लोबल फायनान्सद्वारे सलग 12 व्या वर्षी आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून ओळख निर्माण केली होती. (Top Forbes’ ‘World’s Best Banks’ list in India)

संबंधित बातम्या : 

अवघ्या 2.60 लाखात मारुतीची शानदार कार खरेदीची संधी, कंपनीकडून डिस्काऊंट जाहीर

स्मार्टफोनमध्ये नक्की ठेवा ‘हे’ ॲप्स, पैशांशी निगडीत काम होतील एका क्लिकमध्ये

PHOTO | 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.20 टक्के व्याज, कोणत्या बँकेचा किती व्याजदर?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI