Who is Radhika Merchant: अंबानी कुटुंबाची होणारी सूनबाई राधिका मर्चेंट कोण आहे?

राधिका मर्चेंटचा जन्म कधीचा? तिचं शिक्षण कुठे झालं? तिने मुंबईत कुठे नोकरी केली? अंबानी कुटुंबाशी कशी ओळख झाली? तिचा कुठला फोटो व्हायरल झाला? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

Who is Radhika Merchant: अंबानी कुटुंबाची होणारी सूनबाई राधिका मर्चेंट कोण आहे?
Anant Ambani-Radhika Merchant 2Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 5:30 PM

मुंबई: रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा नुकताच साखरपुडा पार पडला. राधिका मर्चेंटसोबत त्याचा साखरपुडा झाला. उदयपूरच्या एका आलिशान हॉटेलमध्ये हा साखरपुडा पार पडला. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे काही फोटो व्हायरल झालेत. अंबानींच्या धाकट्या मुलाचा ज्या मुलीबरोबर साखरपुडा झाला, ती राधिका मर्चेंट कोण आहे? हा प्रश्न अनेकांना पडलाय.

अनंत आणि राधिकाची कधी झाली ओळख?

राधिक मर्चेंट अनंत अंबानीची बालपणीची मैत्रिण आहे. देशातील प्रमुख औषध कंपनी एनकोर हेल्थकेयरचे सीईओ आणि अब्जाधीश उद्योगपती वीरेन मर्चेंट यांची मुलगी आहे. तिच्या आईच नाव शैला मर्चेंट आहे.

राधिका मर्चेंटचं जन्मवर्ष काय?

राधिका मर्चेंटचा 18 डिसेंबर 1994 रोजी जन्म झाला. ती क्लासिकल डान्सर आहे. आठवर्ष तिने भरतनाट्यमच शिक्षण घेतलय. मुंबईच्या श्री निभा आर्ट अकादमीत गुरु भावना ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने भरतनाट्यमच धडे गिरवलेत.

अंबानी कुटुंबाने ठेवला होता अरंगेत्रमचा कार्यक्रम

याचवर्षी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी छोटी सूनबाई राधिका मर्चेंटसाठी अरंगेत्रम सेरेमनी आयोजित केली होती. कुठल्याही शास्त्रीय संगीताच्या कलाकारासाठी अरंगेत्रम सेरेमनी महत्त्वाची असते. कारण तो त्याचा पहिला स्टेज परफॉर्मन्स असतो.

राधिता मर्चेंटच शिक्षण कुठे झालय?

राधिकाने सुरुवातीच शिक्षण मुंबईच्या इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूल आणि बीडी सोमानी आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये झालय. तिने 2017 साली न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या पॉलिटिकल सायन्स विषयात ग्रॅज्युएशनची डिग्री घेतलीय. शिक्षण संपल्यानंतर ती भारतात आली. इंडिया फर्स्ट ऑर्गनायजेशन आणि देसाई अँड दीवानजी सारख्या फर्ममध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर मुंबईतील रीयल इस्टेट कंपनी इस्प्रवामध्ये ज्यूनियर सेल्स मॅनेजरची नोकरी केली. त्यानंतर फॅमिली बिझनेस जॉईन केला.

स्विमिंगची विशेष आवड

राधिका मर्चेंटला स्विमिंगची विशेष आवड आहे. त्याशिवाय ती अनेकदा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ट्रेकिंगला सुद्धा जाते. तिला शिकायला आवडतं. त्याशिवाय ती प्राणीप्रेमी सुद्धा आहे. 2018 मध्ये व्हायरल झाला फोटो

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या मैत्रीबद्दल लोकांना 2018 साली समजलं. त्यावेळी सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. दोघांनी मॅचिंग ग्रीन कलरच्या कपड्यात लवी-डवी पोज दिली होती. ईशा अंबानीच्या साखरपुड्यानंतर काही दिवसांनी हा फोटो समोर आला होता. राधिका मर्चेंट अनेकदा अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात दिसली आहे.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.