RailwayBudget | शंभरी पूर्ण करण्याआधीच स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प का गुंडाळला ?

RailwayBudget | शंभरी पूर्ण करण्याआधीच स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प का गुंडाळला ?
train

देशात स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाला शंभरी गाठायला उणीपुरी 7-8 वर्षे राहिली असतानाच तो केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला. ब्रिटिशांनी 1924 साली रेल्वे अर्थसंकल्प सादर केला, तेव्हापासून 2016 पर्यंत ही प्रथा सुरु होती. बिबेक देबरॉय आणि किशोर देसाई यांच्या समितीने स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प गुंडाळून टाकण्याची शिफारस केली होती.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 17, 2022 | 8:11 AM

मुंबई : देशात स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाला शंभरी गाठायला उणीपुरी 7-8 वर्षे राहिली असतानाच तो केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला. ब्रिटिशांनी 1924 साली रेल्वे अर्थसंकल्प सादर केला, तेव्हापासून 2016 पर्यंत ही प्रथा सुरु होती. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 92 वर्षांची प्रथा रद्द केली होती आणि 2017 पासून सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प जाहीर करण्यास सुरुवात केली होती.

सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2022-23) सादर करण्यास 15 दिवसांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman) 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 (Budget 2022-23) या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या 5 वर्षांप्रमाणेच यावेळीही रेल्वे अर्थसंकल्प हा सर्वसाधारण अर्थसंकल्पाचा भाग असेल.

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 92 वर्षांची प्रथा रद्द केली होती आणि 2017 पासून सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प जाहीर करण्यास सुरुवात केली होती. तत्पूर्वी, रेल्वेमंत्री सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करत असत.

नीती आयोगाने सल्ला दिला
नीती आयोगानेही सरकारला रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्ररित्या न सादर करण्याचा आणि दशकांपूर्वीचा हा कल संपवण्याचा सल्ला दिला होता. बिबेक देबरॉय आणि किशोर देसाई यांच्या समितीने स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प गुंडाळून टाकण्याची शिफारस केली होती.वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी खूप विचारविनिमय आणि विचारमंथन केल्यानंतर सरकारने रेल्वे अर्थसंकल्पाचे सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला. ही कल्पना व्यावहारिक होती. कारण रेल्वे अर्थसंकल्पाचा वाटा आता केंद्रीय अर्थसंकल्पापेक्षा खूपच कमी आहे

1924 मधील पहिला रेल्वे अर्थसंकल्प
भारताचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प 1924 मध्ये ब्रिटिश राजवटीत सादर करण्यात आला. रेल्वेचा हा पहिलाच स्वतंत्र अर्थसंकल्प होता. तत्पूर्वी, रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पासोबत सादर करण्यात आला होता. 1920-21 मध्ये एक्सवर्थ समितीने रेल्वे अर्थसंकल्पावर आपला अहवाल सादर केला, ज्यात रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर करण्याविषयी आणि त्याच्या आर्थिक बाबींंकडे स्वतंत्रपणे पाहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

अर्थसंकल्प 2022: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार
या वेळी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांना राष्ट्रपतींच्या अभि भाषणाने सुरू होईल आणि 8 एप्रिल रोजी संपेल, हे लक्षात घ्या. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, संसदीय कामकाज विषयक कॅबिनेट समितीच्या शिफारशीचा हवाला देत सूत्रांनी ही माहिती दिली. सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२२ रोजी देशासमोर ठेवला जाईल. अधिवेशनाचा पहिला भाग ११ फेब्रुवारी रोजी संपेल. एका महिन्याच्या विश्रांतीनंतर सत्राचा दुसरा भाग १४ मार्चपासून सुरू होईल आणि ८ एप्रिल रोजी संपेल.

इतर बातम्या :

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित कोरोना पॉझिटिव्ह

Startup India: 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

भारताच्या विकास दरावर ‘संक्रांत’? संयुक्त राष्ट्राच्या अहवालात विकासाला वाकुल्या, इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे अपेक्षित दर गाठता येईना 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें