Petrol-Diesel Price: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? पुतीन यांच्या दौऱ्यादरम्यान मोठी अपडेट, खिश्यात पैसा खुळखुळणार?
Petrol-Diesel Price Reduce: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वीच रशियन लष्करी तळ भारताला वापरण्याला मंजुरी मिळाली आहे. तर एका वृत्तानुसार, कच्चा तेलाच्या Crude Oil किंमतीत मोठी सवलत मिळू शकते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई येऊ शकते.

Vladimir Putin Visit to India: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आजपासून दोन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत. या भेटीपूर्वी अनेक घाडमोडी घडत आहे. अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रांचे या भेटीकडे लक्ष आहे. भारताने रशियाकडून कच्चा तेलाची आयात घटवल्याचे समोर आले आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत (Crude Oil Prices) घसरण सुरू आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यान लवकरच शांतता वार्ता सुरु होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदारांनी कच्चा तेलाची खरेदी थांबवल्याची वार्ता समोर येत आहे. तर दुसरीकडे रशिया भारताच्या मैत्रीखातर कच्चा तेल निर्यातीत अजून सवलत देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला कच्चे तेल अधिक स्वस्तात मिळू शकते. त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर दिसू शकतो.
कच्चा तेलाचा भाव काय?
ब्रेंट क्रूडचा भाव 0221 GMT वर 13 सेंट वा 0.21% च्या घसरणीसह 62.32 डॉलर प्रति बॅरल इतका होता. तर गेल्या सत्रात हा भाव 1.1% घसरला. अमेरिकेतील वेस्ट टेक्सॉस इंटरमीडिएट (WTI) क्रूड ऑईल 12 सेंट वा 0.20% घसरून 58.52 डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करत आहे. या कच्चा तेलात गेल्या काही दिवसात 1.2% टक्क्यांची घसरण दिसली आहे.
रशिया-युक्रेन शांतता वार्ता
रशिया सरकारने बुधवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुख्य प्रतिनिधींमध्ये सुमारे पाच तास चर्चा झाल्याची माहिती दिली. पण रशिया आणि युक्रेनमधील शांतता पर्वावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. भारत दौऱ्यावर रशियन राष्ट्राध्यक्ष याविषयीची मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर कच्चा तेलाच्या किंमती कोसळण्याची भीती सुद्धा व्यक्त होत आहे. जर रशिया-युक्रेन यांच्यात शांतता करार झाला तर जागतिक अस्थिरता कमी होईल.
डॉलरऐवजी दुसऱ्या चलनाचा वापर
रशियाकडून तेल खरेदी करताना भारताने अगोदर डॉलरचा वापर केला. नंतर रियाल, चीनच्या चलनाचा वापर करण्यात आला आहे. अमेरिका सातत्याने भारतावर रशियाकडून कच्चे तेल खरेदी न करण्यासाठी दबाव टाकत आहे. तर अनेक ठिकाणी तेल खरेदीतही अडचणी येत आहे. डॉलर आणि रुपया यांच्यातील चलन विनिमय दरात मोठी तफावत आली आहे. त्याचा फटका भारतीय तेल खरेदीदारांना होत आहे. त्यामुळे डॉलरच, चीनचे चलन, रियाल याशिवाय इतर चलनाचा वापर तेल खरेदीसाठी करण्यात यावे यासाठी प्रयत्न होणार आहे.
टॅरिफचा फटका
एप्रिल 2022 पासून ते जून 2025 याकाळात भारताने रशियाकडून रोज 17-19 लाख बॅरल रशियन कच्चे तेल खरेदी केले. यामुळे भारताची 17 अब्ज डॉलरची बचत झाली. भारतीय कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा झाला. पण रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनिी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावले. इंडिया टुडेच्या एका वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफमुळे भारतीय निर्यातीला जवळपास 37 अब्ज डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे GDP वृद्धी दर 1 टक्के घसरण्याची शक्यता आहे.
