AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या भाव, आज पेट्रोल-डिझेल झाले का स्वस्त?

Petrol Diesel Rate Today : शनिवार-रविवारी सुट्टीचा मूड असेल तर वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचा भाव जाणून घ्या. कुठे स्वस्त तर या शहरात इंधनाचे दर वधारले.

Petrol Diesel Rate Today : वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या भाव, आज पेट्रोल-डिझेल झाले का स्वस्त?
जाणून घ्या आजचा भाव
| Updated on: Jun 10, 2023 | 8:29 AM
Share

नवी दिल्ली : शनिवार-रविवार आला की अनेकांना शहराजवळील नैसर्गिक स्थळ खुणावतात. शहराबाहेर पडण्यापूर्वी वाहनाची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर  पेट्रोल-डिझेलचे भाव जरुर पाहा. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळीच 6 वाजता इंधनाचे दर जाहीर केले. जागतिक बाजारात कच्चा तेलात (Crude Oil Price) घसरण कायम आहे. पण देशात गेल्या 13 महिन्यांत जनतेला कुठलाही दिलासा मिळाला नाही. गेल्या वर्षभरात भाव न वाढवल्याचे कारण पुढे करत नागरिकांचा खिसा कापण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Rate Today) कमी झाल्या नाहीत. कच्चा तेलाचे भाव वधारले की ताबडतोब दरवाढ करणाऱ्या कंपन्या फायद्यात असताना पण दर कपात झालेली नाही.

कच्चा तेलात घसरण आज कच्चा तेलात घसरण झाली. 10 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 74.79 डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल 70.17 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव (Crude Oil Price) हे गेल्या 15 महिन्यातील निच्चांकीस्तरावर आहेत.

अशी भरते सरकारची तिजोरी एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून किती फायदा होतो ते समजू घेऊयात. 10 जून रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतात.

प्रति लिटर इतका फायदा देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.40 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.96 तर डिझेल 93.46 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.02 पेट्रोल आणि डिझेल 93.50 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.49 आणि डिझेल 93.98 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.55 आणि डिझेल 93.08 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 108.50 तर डिझेल 94.93 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.96 आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.91 आणि डिझेल 92.41 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 105.88 रुपये तर डिझेल 92.38 रुपये प्रति लिटर

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?