जर BCCI असती कंपनी, तर Tata-Mahindra ला अशी दिली असती टक्कर!

BCCI Networth | क्रिकेट विश्वकपावर भारताला नाव कोरता आले नसले तरी, भारताने हा इव्हेंट इनकॅश केला. यशस्वी आयोजनामुळे भारताची मान जगात उंचावली. भारतीय क्रिकेट बोर्ड, BCCI ने यामाध्यमातून जोरदार कमाई केली. त्यामुळेच ती एकप्रकारे टाटा आणि महिंद्राच्या तोलामालाची कंपनी म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जर BCCI असती कंपनी, तर Tata-Mahindra ला अशी दिली असती टक्कर!
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 9:33 AM

नवी दिल्ली | 26 नोव्हेंबर 2023 : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणजे BCCI, ही एक प्रकारची संपन्न, सधन, समृद्ध कंपनीच आहे. ती Tata, Britannia, Mahindra पेक्षा तसूभर पण कमी नाही. कमाईच्या बाबतीत भारतीय क्रिकेट बोर्डाने अनेक रेकॉर्ड नावावर नोंदवले आहे. तर अनेक रेकॉर्ड तोडले आहे. ICC Men’s Cricket World Cup मधील कमाई यामध्ये जोडल्यास अनेक दिग्गज कंपन्यांना धोबीपछाड देण्यात बीसीसीआय मागे नाही. अनेकांना यावर विश्वास वाटत नसेल. पण बीसीसीआयची कमाई किती होते ते तुम्हाला माहिती आहे का?

IPL सोन्याची अंडी देणारी कोंबडी

बीसीसीआय 2008 पासून कमाईत अनेक रेकॉर्ड करत आहे. ‘इंडियन प्रीमिअर लीग’ (IPL) च्या रुपाने बीसीसीआयला सोन्याची अंडी देणारी कोंबडी गवसली आहे. बीसीसीआयचा एकूण महसूलात आयपीएलचा वाटा 51% इतका आहे. बीसीसीआय मीडिया राईट्सच्या माध्यमातून तगडी कमाई करते. यावर्षी तर भारतीय क्रिकेट बोर्डाला छप्परफाड कमाई करता आली. कारण या मंडळाने जागतिक क्रिकेट विश्वचषकाचे यशस्वी आयोजन केले होते. त्यातून मोठा पैसा गोळा करता आला.

हे सुद्धा वाचा

ताळेबंद तर अगदी मजबूत

बीसीसीआयने मार्च 2022 च्या शेवटपर्यंत 4360 कोटी रुपयांचा महसूल जमा केला. यावर्षी तर आयसीसी वर्ल्डकपमुळे त्यांचा मोठा फायदा झाला. बीसीसीआयचा महसूल कित्येक पटीने वाढला. विश्वचषकाच्या आयोजनामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाला आयसीसीकडून 2027 पर्यंत कमाईचा मोठा हिस्सा मिळत राहील. ही कमाई जोडली तर बीसीसीआयचा समावेश जगातील त्या बोटावर मोजण्या इतक्या बोर्डामध्ये होईल, ज्यांची कमाई 10,000 कोटी रुपये रोख आहे.

मीडिया राईट्समधून मोठी कमाई

बीसीसीआयला आयपीएलमधून मोठी कमाई होते. तर मीडिया राईट्समधून गंगाजळी येते. आयपीएल मीडिया राईट्सच्या माध्यमातून बीसीसीआयने 48,391 कोटी रुपयांचा महसूल जमा केला. तर 2021 मध्ये दोन नवीन आयपीएल टीम ‘लखनऊ सुपर जायंट्स’ च्या राइट विक्रीतून 7090 कोटी आणि गुजरात टायटन्सच्या राईट्समधून 5625 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Tata आणि Mahindra शी स्पर्धा

बीसीसीआयच्या महसूलाचा आलेख पाहिला तर तो जोरदार आहे. बीसीसीआय शेअर बाजारात असती तर ती गुंतवणूकदारांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली असती. 2022 मधील आकडेवारीनुसार, तिचे बाजारातील एकूण भांडवल 1.3 लाख कोटी रुपये असते. टाटा आणि महिंद्राला बीसीसीआयने जोरदार आव्हान दिले असते.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.