टाटा मोटर्ससोबत तुम्हीसुद्धा सुरू करू शकता व्यवसाय, जाणून घ्या…

टाटा मोटर्सच्या निवेदनानुसार, नवीन आउटलेट 53 शहरांमध्ये उघडण्यात आलीत, जी दक्षिण भारतातील प्रमुख उदयोन्मुख बाजारांची मागणी लक्षात घेऊन रणनीतिकदृष्ट्या सुरू करण्यात आलीत. या शोरूममध्ये कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलिओसह प्रवासी वाहनांची 'न्यू फॉरएव्हर' श्रेणी असेल.

टाटा मोटर्ससोबत तुम्हीसुद्धा सुरू करू शकता व्यवसाय, जाणून घ्या...
Tata Motors
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 7:14 AM

नवी दिल्लीः जर तुम्हाला टाटा मोटर्ससोबत व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला आता हे काम करता येणार आहे. टाटा मोटर्स आपली किरकोळ विक्री वाढवण्यासाठी वेगाने काम करतेय, यासाठी नवीन विक्री केंद्रे उघडली जात आहेत. तुम्ही टाटा मोटर्सचे आऊटलेटदेखील उघडू शकता. टाटा मोटर्सने शुक्रवारी किरकोळ विक्रीला गती देण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून दक्षिण भारतात एकाच वेळी 70 विक्री केंद्रे सुरू केलीत.

टाटा मोटर्सच्या निवेदनानुसार, नवीन आउटलेट 53 शहरांमध्ये उघडण्यात आलीत, जी दक्षिण भारतातील प्रमुख उदयोन्मुख बाजारांची मागणी लक्षात घेऊन रणनीतिकदृष्ट्या सुरू करण्यात आलीत. या शोरूममध्ये कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलिओसह प्रवासी वाहनांची ‘न्यू फॉरएव्हर’ श्रेणी असेल. नवीन शोरूममुळे दक्षिण भारतातील (कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ) टाटा मोटर्सचे आउटलेट नेटवर्क 272 पर्यंत वाढेल. यासह संपूर्ण भारतात त्यांची संख्या 980 पर्यंत वाढेल.

एवढी मोठी रक्कम गुंतवावी लागेल

भारतातील सर्वात मोठ्या वाहन कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने देशाला युटिलिटी वाहने आणि कारची सर्वात मोठी श्रेणी दिली. टाटा मोटर्ससारख्या नामांकित कंपनीसाठी फ्रँचायझी होण्यासाठी तुम्हाला सुमारे 10 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ही रक्कम कार्यशाळा, उपकरणे, वाहनांची किंमत, सुटे भाग आणि ऑपरेटिंग सिस्टम जसे की संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर इत्यादींवर खर्च केली जाईल.

हे काम करावे लागणार

कार डीलरशिपसाठी देखील तुम्हाला त्याच गुंतवणूक योजनेंतर्गत जावे लागेल. गुंतवणुकीची रक्कम मेट्रो शहरे आणि शहरांमध्ये बदलते. फ्रँचायझीची क्षमता आणि व्यवसायाची शक्यता स्वतःच स्थानावर अवलंबून असते. यासाठी तुम्ही एकदा बाजारात आधीच अस्तित्वात असलेल्या फ्रँचायझींशी याबद्दल बोलू शकता. त्यानुसार गुंतवणुकीच्या संभाव्य रकमेचा अंदाज घेऊन आउटलेट उघडता येईल.

खूप जागा आवश्यक

चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि मुंबईसारख्या प्रमुख मेट्रो शहरांमध्ये टाटा मोटर्स शोरूम चालवण्यासाठी किमान जागेची आवश्यकता 5000-6000 चौरस फूट आहे. शहरांमध्ये जागेची आवश्यकता किमान 3000 ते 4000 चौरस फूट आहे. जर तुम्ही टाटा मोटर्स डीलरशिपसाठी अर्ज करत असाल, तर तुम्हाला पुढील पाच वर्षांत तुम्ही किती टाटा मोटर्स वाहने विकू शकाल, ते तुम्ही जिथे बसवणार आहात त्या ठिकाणाभोवती नमूद करावे लागेल. ही अंदाजे संख्या असेल. कंपनी वेळोवेळी डीलरशिपसाठी अर्ज काढते.

संबंधित बातम्या

आता PF खात्यावर कर लागणार, आपले किती पैसे कापणार? जाणून घ्या…

EPF च्या नियमांमध्ये मोठा बदल, आता नोकरदारांसाठी दोन पीएफ खाती असणार, जाणून घ्या का?

You too can start a business with Tata Motors, find out …

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.