आता PF खात्यावर कर लागणार, आपले किती पैसे कापणार? जाणून घ्या…

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या या निर्णयानंतर सामान्य नोकरदारांना अनेक प्रश्न पडलेत. आता कराचा हिशेब कसा लावला जाईल?, एकाच पीएफ (Provident Fund) खात्यात किती रकमेवर कर लागणार आणि किती रकमेवर लागणार नाही याचा नेमका फॉर्म्युला काय असेल?,

आता PF खात्यावर कर लागणार, आपले किती पैसे कापणार? जाणून घ्या...
New income tax rule
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 1:11 PM

नवी दिल्लीः भविष्य निर्वाह निधी म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड( Employees’ Provident Fund) वर आता कर आकारणीला सुरुवात झाल्यानं अनेकांची चिंता वाढलीय. पीएफ खात्यात वर्षाला अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यास व्याजावर कर भरावा लागणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलीय. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात कंपनीकडून पैसे जमा केले जात नसतील त्यांना वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर सूट मिळणार असल्याचीही माहिती त्यांनी दिलीय.

परंतु केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या या निर्णयानंतर सामान्य नोकरदारांना अनेक प्रश्न पडलेत. आता कराचा हिशेब कसा लावला जाईल?, एकाच पीएफ (Provident Fund) खात्यात किती रकमेवर कर लागणार आणि किती रकमेवर लागणार नाही याचा नेमका फॉर्म्युला काय असेल?, वर्षभरानंतर कोणत्या रकमेवर किती व्याजापर्यंत सूट मिळेल आणि किती रकमेनंतर कर आकारला जाईल?, सरकार PFच्या रकमेवर पूर्णपणे कर लावण्याच्या तयारीत आहे काय? अशा अनेक प्रश्नांनी सामान्य नोकरदारांच्या मनात घरं केलंय. त्याची उत्तर ते शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. चला तर त्यासंदर्भात जाणून घेऊयात.

नेमका कर वसूल करण्याची पद्धत कोणती?

ज्यांच्या खात्यामध्ये करासंदर्भात मर्यादेपेक्षा अधिक रक्कम जमा होत असेल, त्यांची एक नव्हे तर दोन पीएफ खाती असणं गरजेचं आहे. एका खात्यात आतापर्यंत कपात झालेली रक्कम आणि व्याजाची पूर्ण रक्कम राहणार आहे. या खात्यात जमा रक्कम किंवा त्यावर लागणारं व्याज करमुक्त असेल. तसेच जी रक्कम या मर्यादेपेक्षा अधिक असेल ती एका वेगळ्या खात्यात जमा केली जाणार आहे. या खात्यात जमा होणाऱ्या रकमेवर जे व्याज मिळेल, त्यावर दरवर्षी तुमच्या उत्पन्नाच्या स्लॅबनुसार कर आकारला जाणार आहे. या बदलासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे सीबीडीटीनं प्राप्तीकर आयकर 1962 मध्ये बदल केलाय. कर लागणारी रक्कम एका खात्यात आणि कर लागणार नाही अशी रक्कम दुसऱ्या खात्यात राहणार असल्याने खातेधारकांसाठी कराचा हिशेब करणं सोपं होईल, असंही तज्ज्ञ सांगतात.

सामान्य लोक आणि नोकरदारांवर काय परिणाम?

2018-19 या वर्षात 1.23 लाख धनाढ्यांनी त्यांच्या पीएफ खात्यांमध्ये 62,500 कोटी रुपये जमा केले असल्याचंदेखील सांगण्यात आलं होतं. एकाच पीएफ खात्यामध्ये 103 कोटी रुपये जमा असल्याचीही माहिती समोर आली होती. हे देशातील सर्वात मोठे पीएफ खाते आहे. प्रकारच्या देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या 20 धनदांडग्यांच्या खात्यांमध्ये 825 कोटींची रक्कम जमा आहे. त्यापैकी प्रत्येकजण दरवर्षी 50 लाखांच्या आसपास करमुक्त व्याजाची कमाई करत होता. देशात सध्या जवळपास सहा कोटी पीएफ खाती असल्यानं त्याचा सामान्यांवरही परिणाम होत आहे. जर तुमच्या पगारातून दर महिन्याला कपात होणाऱ्या पीएफची रक्कम 20833.33 रुपयांपेक्षा अधिक असेल किंवा तुमच्या कंपनीकडून काहीही रक्कम जमा केली जात नसेल आणि तुमची कपात 41,666.66 पेक्षा अधिक असेल, तरच तुम्हाला याबाबत विचार करावा लागेल. तुमचं स्वतंत्र पीएफ खाते सुरू करून दोन्ही खात्यांमध्ये त्या हिशेबानं रक्कम टाकायला सुरुवात करावी लागेल. पण तुम्हाला पीएफ कार्यालयाकडून येणारे मेल किंवा पत्र यावर लक्ष ठेवावं लागेल.

संबंधित बातम्या

EPF च्या नियमांमध्ये मोठा बदल, आता कर्मचाऱ्यांसाठी दोन पीएफ खाती असणार, जाणून घ्या का?

SBI Alert: ‘या’ ग्राहकांना बँकेत जाऊन करावे लागणार हे काम, अन्यथा…

Now PF account will be taxed, how much money will you deduct? Find out …

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.