AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Jobs 2023 : बँकेत विविध पदांसाठी 8 हजारांहून अधिक जागा; असा कराल अर्ज

Bank Recruitment 2023: आयबीपीएसने विविध पदांसाठी भरती करण्याचं ठरवलं आहे. या पदांसाठी उमेदवार आपल्या योग्यतेनुसार अधिकृत वेबसाईट ibps.in वर ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकतात.

Bank Jobs 2023 : बँकेत विविध पदांसाठी 8 हजारांहून अधिक जागा; असा कराल अर्ज
Bank Jobs 2023 : बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, क्लर्क, पीओसहीत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
| Updated on: Jun 02, 2023 | 3:42 PM
Share

मुंबई : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना वेध लागतात ते नोकरीचे..अनेक जण आपल्या क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी धडपड करतात. बँकेच्या नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने विविध सरकारी बँकांमध्ये लिपिक पीओसह अनेक पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ऑफिस असिस्टंट (लिपिक), ऑफिसर स्केल-I/PO (असिस्टंट मॅनेजर) आणि ऑफिसर स्केल 2 (व्यवस्थापक) आणि ऑफिस स्केल 3 (वरिष्ठ मॅनेजर) या पदांसाठी एकूण 8612 पदांची भरती करायची आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या विविध ग्रामीण बँकांमध्ये जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जून 2023 पासून सुरू झाली आहे. उमेदवार IBPS ऑनलाइन ibps.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे.

या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे विहित करण्यात आली आहे. वयोमर्यादाही स्वतंत्रपणे ठरवण्यात आली आहे. अधिक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा माहितीसाठी उमेदवार जारी केलेली भरती अधिसूचना तपासू शकतात. या सर्व पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रांद्वारे केली जाईल.

या पदांसाठी केली जाणीर भरती

  • ऑफिस असिस्टंट – 5538 पदे
  • अधिकारी स्केल I – 2485 पदे
  • ऑफिसर स्केल II (कृषी अधिकारी) – 60 पदे
  • ऑफिसर स्केल II (मार्केटिंग ऑफिसर) – 3 पदे
  • ऑफिसर स्केल II (ट्रेझरी मॅनेजर) – 8 पदे
  • ऑफिसर स्केल II (कायदा) – 24 पदे
  • ऑफिसर स्केल II (CA) – 18 पदे
  • ऑफिसर स्केल II (IT) – 68 पदे
  • ऑफिसर स्केल II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 332 पदे
  • अधिकारी स्केल III – 73 पदे

पदासाठी असा कराल अर्ज

  • आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.
  • मुख्यपृष्ठावर दिलेल्या संबंधित पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  • मेल आयडी इत्यादी आवश्यक तपशील प्रविष्ट करून नोंदणी करा.
  • आता अर्ज प्रक्रिया सुरू करा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.