
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. मुंबईमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबईमध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि भरती प्रक्रियेबद्दल अधिक.
भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे 50 पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 मे 2024 पासून सुरू झालीये. 7 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.
ही भरती प्रक्रिया चालक (ड्रायव्हर) पदासाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. हेवी मोटार व्हेईकल आणि लाइट मोटार व्हेईकल वाहने चालविण्याचे वैध लायसन्स देखील अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक आहे.
https://www.barc.gov.in/ या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागेल. मुख्य प्रशासकीय अधिकारी (कार्मिक) सेंट्रल कॉम्प्लेक्स, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई, या पत्त्यावर उमेदवारांना अर्ज पाठवावा लागेल.
वरील पत्त्यावर आपल्याला 7 जून 2024 च्या अगोदर अर्ज हा करावा लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागेल. https://www.barc.gov.in/careers/vacancy8.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचण्यास मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.