मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून पुन्हा तू तू मै मै, आजच्या बैठकीनंतर भाजप आक्रमक

उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेच्या लोकार्पण कार्यक्रमाला हजर राहिले. त्यामुळं भाजप आता आक्रमक झालीय. चंद्रकांत पाटलांनी थेट, मुख्यमंत्रिपदाचा चार्जच दुसऱ्यांना देण्याची मागणी केलीय.

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून पुन्हा तू तू मै मै, आजच्या बैठकीनंतर भाजप आक्रमक
उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील

तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray), कोरोनाच्या परिस्थितीवर मोदींनी (Pm modi) बोलावलेल्या ऑनलाईन बैठकीला गैरहजर राहिले. मात्र दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेच्या लोकार्पण कार्यक्रमाला हजर राहिले. त्यामुळं भाजप आता आक्रमक झालीय. चंद्रकांत पाटलांनी थेट, मुख्यमंत्रिपदाचा चार्जच दुसऱ्यांना देण्याची मागणी केलीय. तर महापालिकेच्या ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमातून, उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावण्याची संधी सोडली नाही. प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. कोरोनावरच्या आढावा बैठकीत, उद्धव ठाकरेंच्या ऐवजी राजेश टोपे उपस्थित होते.

याआधीही मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या

याआधी 1 जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना ऑनलाईन संबोधन केलं..ज्यात 500 चौरस फुटाखालील घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली. 5 जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. आणि आता 14 जानेवारीला महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

मोदींच्या बैठकीला हा हजेरी नाही? भाजपचा सवाल

त्यामुळं महापालिकेच्या आणि पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावता. मग मोदींच्या बैठकीला का नाही?, असा प्रश्न भाजपचा आहे. त्यातच चंद्रकांत पाटील अधिक आक्रमक होत असल्यानं संजय राऊतांनी, थेट चष्म्याचा नंबरच तपासण्याची भाषा केली. त्यावरुन पुन्हा राऊत आणि पाटलांमध्ये जुंपलीय. भाजप असो की शिवसेना, दोघांनाही एकमेकांवर तुटून पडण्याची संधी हवी असते. आता मुख्यमंत्री फक्त महापालिकेचा कार्यक्रम आणि शिवसेना नेत्यांच्या बैठकीलाच हजर राहत असल्यानं. भाजपच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरे आलेत.

आरोग्यमंत्र्यांकडून केंद्राकडे लसीची मागणी, चंद्रकांतदादा म्हणतात राज्यात पुरेसा साठा! कोण खरं, कोण खोटं?

विरोधात बोलले म्हणून कामावरून काढणे योग्य नाही, किरण माने प्रकरणावरून उदय सामंत यांचा संताप; काय म्हणाले सामंत?

कलाकारांची मुस्कटदाबी खपवून घेणार नाही, किरण माने यांच्यावरून आता राष्ट्रवादीचाही इशारा

Published On - 10:14 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI