DRDO Recruitment 2021 : डीआरडीओमध्ये अप्रेंटिसची संधी, अर्ज करण्यासाठी शेवटची संधी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने प्रशिक्षणार्थी पदासाठी भरतीसाठी अर्ज दाखल करण्याचं आवाहन केलं आहे.

DRDO Recruitment 2021 : डीआरडीओमध्ये अप्रेंटिसची संधी, अर्ज करण्यासाठी शेवटची संधी
job

DRDO Recruitment 2021 नवी दिल्लीः संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने प्रशिक्षणार्थी पदासाठी भरतीसाठी अर्ज दाखल करण्याचं आवाहन केलं आहे. या अंतर्गत एकूण 100 पेक्षा जास्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट https://rac.gov.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे शेवटचे काही तास शिल्लक आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.

पदांचा तपशील

डीआरडीओने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पदांपैकी पदवीधर प्रशिक्षणार्थीच्या 50 आणि तंत्रज्ञ पदविकाच्या 40 पदांची नियुक्ती केली जाईल. त्याचबरोबर प्रशिक्षित अप्रेंटिसच्या 25 पदांवर भरती होणार आहे. पदांच्या संख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

निवड प्रक्रिया

अप्रेंटिससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या पात्रता स्तरावरील परीक्षेतील प्राप्त गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हर्च्युअल) पद्धतीने शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाठी वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.

निवड झालेल्या उमेदवारांना रुजू होताना ‘वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र’ सादर करावे लागेल. उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी मोबाईल/पेन ड्राइव्ह/लॅपटॉप/इलेक्ट्रॉनिक उपकरणे/कॅमेरा आणण्याची परवानगी नसेल. प्रशिक्षण कालावधी 12 महिन्यांचा असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन

लेखी परीक्षा/मुलाखतीसाठी प्रवेशपत्रासंदर्भातील माहिती लवकरच अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन दिली जाईल. उमेदवारांना लेखी चाचणी/मुलाखत कॉल लेटरची कोणतीही हार्डकॉपी पाठवली जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 8 ते 9 हजार रुपयांपर्यंत मानधन दिलं जाणार आहे.

इतर बातम्या:

अमरावतीपाठोपाठ अकोल्यातील अकोटमध्येही संचारबंदी, दगडफेकीच्या घटनेनंतर तात्काळ निर्णय

राजकारण पेटलेः 93 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का, चंद्रकांत पाटलांचा सवाल

DRDO Recruitment 2021 apprentice post for over 100 posts at drdo gov in check details here

Published On - 11:59 am, Sun, 14 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI