AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त पैसे मोजतच राहा… तुमचा विश्वासही बसणार नाही एवढा पगार दुबईत मिळतो; माहीत आहे काय?

दुबईमध्ये विविध प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये मजूर, पॅकिंग सहाय्यक आणि हाउसकीपर यांचा समावेश आहे. या नोकऱ्यांचे पगार भारतापेक्षा कितीतरी पट जास्त आहेत. नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि पगाराची माहिती या लेखात दिली आहे.

फक्त पैसे मोजतच राहा... तुमचा विश्वासही बसणार नाही एवढा पगार दुबईत मिळतो; माहीत आहे काय?
| Edited By: | Updated on: Jan 11, 2025 | 3:34 PM
Share

भरघोस पगाराची नोकरी करण्याची, जास्तीत जास्त पैसा कमावण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. काहींना तर आखाती देशात जाऊन पैसा कमावण्याची इच्छा निर्माण होते. त्यातही दुबई सारख्या ठिकाणी जाऊन पैसा कमवावा असं सर्वांना वाटतं. कारण त्यांच्या परिचयाचे कोणी ना कोणी तरी दुबईला जाऊन आलेला असतो. त्याने भरपूर पैसा कमावलेला असतो. त्यामुळे त्याचं पाहून इतरांनाही दुबईत जाऊन पडेल ते काम करून पैसा कमावण्याची इच्छा होते. दुबईत चिक्कार नोकऱ्या आहेत. हेल्परपासून मजुरापर्यंत आणि बड्या पोस्टपर्यंत… सर्वच श्रेणीतील नोकऱ्या आहेत. पण दुबईत काम करणाऱ्यांचा पगार किती आहे माहीत आहे का? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दुबईतही क्लिनिंग, फूड पॅकिंग, सामान उचलणं, मसाला बनवणं, स्वंयपाक्या आदी कामे आहेत. मजुरीपासून पॅकिंगपर्यंतच्या कामाला माणसांची गरज असते. कामगार मिळत नसल्याने परदेशातून आलेल्या कामगारांना दुबईत काम दिलं जातं. त्यासाठी चांगला पैसाही मोजला जातो. तुम्ही कमी शिकलेला असाल आणि कामचलाऊ इंग्रजी बोलत असाल तर काम करण्यासाठी दुबई तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. कारण दुबईत भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ येथून गेलेले कामगारच अधिक आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्पर म्हणून तुमची सॅलरी भारताच्या तुलनेत दुबईमध्ये दोन ते तीन पट जास्त असते.

मजुराचा पगार किती?

दुबईमध्ये एका सामान्य मजुराचा पगार साधारणपणे 900 ते 1000 दिरहम असते, जे भारतीय चलनानुसार साधारण 20,000 ते 23,000 रुपये होते. ही बेसिक सॅलरी आहे. जर तुम्ही कंपनीत ओव्हरटाइम काम केलात, तर तुम्हाला साधारणतः 1100 ते 1200 दिरहम मिळू शकतात. म्हणजे रुपयाच्या भाषेत सांगायचे तर 25,000 ते 27,000 रुपये असतात.

पॅकिंग सहाय्यकाचा पगार किती?

दुबईमध्ये पॅकिंगचं काम खूप कमी आहे, कारण इथे ऑटोमेटेड मशीनचा वापर होतो. त्याद्वारेच प्रोडक्ट्स पॅक केलं जातं. तरीही, जर तुम्हाला पॅकिंगसारख्या कामांमध्ये नोकरी करायची असेल, तर तुम्ही प्रोडक्ट्सला ट्रॉलीद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करू शकता. यासाठी दुबईच्या कंपन्या पॅकिंग सहाय्यकांना साधारणपणे 800 ते 1000 दिरहम पगार मिळतो. म्हणजे भारतीय चलनानुसार 18,000 ते 22,000 रुपये पगार मिळतो.

हाउसकीपरची सॅलरी किती?

दुबईमध्ये हाउसकीपरची सॅलरी साधारणपणे 1100 ते 1200 दिरहम दरमहा आहे. भारतीय रुपयात महिन्याला 24,000 ते 26,000 रुपये होतात. तुम्हाला दुबईमध्ये हाउसकीपिंगचं काम करायचं असेल, तर तुम्ही दुबईच्या होटेल्समध्ये नोकरी करू शकता. कारण तिथे तुम्हाला मोफत जेवण, राहण्यासाठी रूम, ट्रान्सपोर्टेशन, मेडिकल फायदे इत्यादी सुविधा दिल्या जातात. मात्र, दुबईमध्ये हाउसकीपिंगचं काम मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1-2 वर्षांचा अनुभव असावा लागतो. कारण ज्यांना हाऊसकिंपिंगचा अनुभव आहे, अशा लोकांनाच होटेल्स प्राधान्य देत असते.

  • हेल्परच्या नोकरीसााठी पात्रता काय?
  • कमीत कमी 10 वी पास असायला हवं
  • वय किमान 18 आणि जास्तीत जास्त 45 वर्षांपर्यंत असावं.

तुम्हाला थोडं-थोडं इंग्रजी बोलता आणि समजता आलं पाहिजे. कारण दुबईमध्ये अरबीसह इंग्रजीही बोलली जाते. मात्र, दुबईमध्ये तुम्हाला भारतीय, पाकिस्तानी, नेपाळी आणि इतर देशांचे लोकही मिळतील ज्यांच्याशी हिंदीत संवाद साधता येईल. तुमचं शरीर पूर्णपणे निरोगी असावं, जेणेकरून तुम्ही मेडिकल टेस्ट पास करू शकाल.

दुबई जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रं

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • व्हिसा
  • निवासाचा दाखला
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • मेडिकल टेस्ट प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचं फोटो

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!