AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ESIC Recruitment 2022: पदव्युत्तर पदवीधारकांसाठी शेकडो जागा रिक्त! पगार 2 लाख रुपयांपर्यंत, वाचा सविस्तर

ESIC Jobs: संबंधित विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2022 आहे.

ESIC Recruitment 2022: पदव्युत्तर पदवीधारकांसाठी शेकडो जागा रिक्त! पगार 2 लाख रुपयांपर्यंत, वाचा सविस्तर
ESIC Recruitment 2022Image Credit source: Official Website
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 09, 2022 | 1:31 PM
Share

ESIC Recruitment 2022: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees State Insurance Corporation,ESIC Recruitment) ने शिक्षक पदांच्या 2022 च्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे ESIC PGIMSRS आणि ESIC वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical Colleges)सहाय्यक प्राध्यापकांची एकूण 491 पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2022 आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अपूर्ण फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत आणि फॉर्म सबमिट करण्यास विलंब झाल्यास महामंडळ जबाबदार राहणार नाही. अर्ज (Job Application) करण्यापूर्वी खाली दिलेली महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक वाचा.

कोण अर्ज करू शकतो?

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवीधर असावा. आणि कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे. वयोमर्यादा शिथिलता संबंधित अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिसूचना तपासू शकतात.

अर्ज शुल्क

सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 500 आहे तर SC/ST/PWD/महिला उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अर्जाची फी डिमांड ड्राफ्टद्वारे भरावी.

इथे क्लिक करा  ESIC भरती 2022 अधिसूचना 

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीचा समावेश आहे जी मुलखात मंडळाद्वारे घेतली जाईल. ESIC ने ठरवल्यानुसार या पदांसाठी मुलाखत योग्य ठिकाणी घेतली जाईल.

अर्ज कसा आणि कुठे करायचा?

  1. सर्वप्रथम esic.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. वेबसाइटवरील अधिसूचना आणि फॉर्म लिंकवर क्लिक करा.
  3. उमेदवारांनी भरलेला अर्ज प्रादेशिक संचालक, ESI कॉर्पोरेशन, पंचदीप भवन सेक्टर-16 (लक्ष्मी नारायण मंदिराजवळ), फरीदाबाद-121002, हरियाणा येथे शेवटच्या तारखेपूर्वी पाठवणे आवश्यक आहे.
  4. हे लक्षात ठेवा की उमेदवारांना अधिसूचनेत नमूद केलेली स्व-साक्षांकित कागदपत्रे जसे की जन्म प्रमाणपत्र, गुणपत्रिका, पुरावा ओळखपत्र इत्यादी फॉर्ममध्ये सादर करावे लागतील.

किती पगार मिळेल?

सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-11 अंतर्गत दरमहा रु. 67700 ते रु. 208700 पर्यंत पगार आणि लागू भत्त्यांचा लाभ मिळेल.

Follow Us
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?