IBPS PO Recruitment 2021: आयबीपीएसकडून प्रोबेशनरी ऑफिसर्स भरती जाहीर, 4135 जागांवर संधी, अर्ज कुठे करायचा?

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून विविध बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर्स पदावरील 4135 जागांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

IBPS PO Recruitment 2021: आयबीपीएसकडून प्रोबेशनरी ऑफिसर्स भरती जाहीर, 4135 जागांवर संधी, अर्ज कुठे करायचा?
सैन्य दलांमध्ये 400 पदांची भरती, एनडीए परीक्षेची तारीख जाहीर
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 1:21 PM

IBPS PO Recruitment 2021 नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून विविध बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर्स पदावरील 4135 जागांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 10 नोव्हेंबर पर्यंत किंवा त्यापूर्वी ibps.in वर IBPS च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावे. विहित पात्रतेची संपूर्ण माहिती आयबीपीएसनं जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध आहे.

कोणत्या बँकांमंध्ये भरती

आयबीपीएसच्या नोटिफिकेशननुसार बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामधील प्रोबेशनरी ऑफिसरपदाचासाठी भरती प्रक्रिया घेतली होत आहे.

पूर्व परीक्षा कधी?

आयबीपीएसकडून प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. पहिल्या टप्प्यात पूर्व परीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा द्यावी लागते. भरतीचा पहिला टप्पा म्हणून पूर्व परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं पार पडेल. पूर्व परीक्षा 04 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. उत्तीर्ण झालेले उमेदवार जानेवारी 2022 मध्ये मुख्य परीक्षेला पात्र असतील. निवड झालेल्या उमेदवाराला 14500-25700/-वेतनश्रेणी मिळेल.

बँक निहाय जागा

बँक ऑफ इंडिया : 588 बँक ऑफ महाराष्ट्र : 400 कॅनरा बँक:650 सेंट्रल बँक ऑफ इंडिया:620 इंडियन ओव्हरसीज बँक: 98 पंजाब अँड सिंध बँक: 427 यूको बँक:440 युनियन बँक ऑफ इंडिया: 912

महाराष्ट्रात 390 पदांसाठी राज्य सेवा परीक्षेची जाहिरात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली. 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

इतर बातम्या:

MPSC कडून मोठी अपडेट, ऑनलाईन अर्ज प्रणाली अपग्रेड होणार, आयोगाकडून ट्विटद्वारे माहिती

MPSC PSI Physical Test Date | एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणीची तारीख जाहीर, तब्बल दोन वर्षानंतर मुहूर्त

IBPS PO Recruitment 2021issue notification for 4135 post in various banks check details here

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.