AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Job News: भारतीय हवाई दलात 357 पदांवर भरती प्रक्रिया, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

इंडियन एअर फोर्स म्हणजेच भारतीय हवाई दलात नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. भारतीय हवाई दलात एकूण 357 पदांवर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

Job News: भारतीय हवाई दलात  357 पदांवर भरती प्रक्रिया, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 12:34 PM
Share

IAF AFCAT Recruitment2021 नवी दिल्ली: इंडियन एअर फोर्स म्हणजेच भारतीय हवाई दलात नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. भारतीय हवाई दलात एकूण 357 पदांवर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी भारतीय हवाई दलाच्या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून आहे. पात्र उमेदवार ऑफिशियल वेबसाईट afcat.cdac.in वर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. एअर फोर्सकडून परीक्षांची तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. ( Indian Air Force AFCAT Recruitment 2021 for 357 posts click here for registration)

कोणत्या पदांवर भरती

इंडियन एअर फोर्सच्या नोटिफिकेशननुसार एकूण 357 पदांवर भरती आयोजित करण्यात आली आहे. एएफसीएटी साठी 96 पदे, ग्राऊंड ड्यूटी टेक्निकल साठी 107 पदे, आणि ग्राऊंड ड्यूटी नॉन टेक्निकल 96 पदं, मेट्रोलॉजी साठी 28 आणि इतर पदांसाठी एनसीसी स्पेशल एन्ट्री असेल. इंडियन एअर फोर्सच्या या भरती प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता

फ्लाइंग ब्रांच साठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित आणि भौतिकशास्त्रातून पदवी उत्तीर्ण झालेले असावेत. ग्राऊंड ड्यूटी साठी 12वी पास अर्ज सादर करु शकतात. ग्राऊंड बीपी नॉन टेक्निकल लॉजिस्टिक साठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करु शकतात. अकाऊंट विभागातील पदासाठी अर्ज करण्यासाठी वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. एनसीसी स्पेशल एन्ट्रीमध्ये अर्ज करण्यासाठी एनसीसी एयर विंग सीनियर डिवीजन ‘सी’ सर्टिफिकेट असणारे उमेदवार अर्ज करु शकतात.

अर्ज कुठे दाखल करायचा

इंडियन एअर फोर्सच्या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणारे उमेदवार ऑफिशियल वेबसाईट afcat.cdac.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात.

संबंधित बातम्या:

Indian Navy Admit Card : भारतीय नौदलात 2500 पदांसाठीच्या भरतीचं ॲडमिट कार्ड जारी

NCPOR recruitment 2021: ध्रुवीय आणि महासागर संशोधन संस्थेत विविध पदांवर भरती, 56 हजारापर्यंत पगाराची संधी

( Indian Air Force AFCAT Recruitment 2021 for 357 posts click here for registration)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.