AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी पाससाठी थेट भारतीय नौदलात बंपर भरती, याप्रमाणे अर्ज करा आणि मिळवा थेट सरकारी नोकरी

भारतीय नौदलात मोठी बंपर भरती सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी पाससाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. विशेष म्हणजे याचे अर्ज देखील सुरू आहेत. ही केंद्र सरकारची नोकरी असणार आहे. अर्ज करताना काही गोष्टी फाॅलो कराव्या लागणार आहेत. चला मग आजच करा अर्ज आणि मिळवा थेट केंद्र सरकारची नोकरी.

दहावी पाससाठी थेट भारतीय नौदलात बंपर भरती, याप्रमाणे अर्ज करा आणि मिळवा थेट सरकारी नोकरी
| Updated on: Nov 23, 2023 | 7:52 PM
Share

मुंबई : दहावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. दहावी पासवर तुम्ही थेट सरकारी नोकरी करू शकता. थेट भारतीय नौदलात काम करण्यासाठी संधी मिळणार आहे. मग आता वाट कशाची बघता थेट अर्ज करा आणि मिळवा केंद्र सरकारची नोकरी. भारतीय नौदलाने ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे तब्बल 275 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छुकांनी लगेचच अर्ज करा आणि मिळवा केंद्र सरकारची नोकरी. इतर कोणत्याही नाही तर या पदांसाठी apprenticeship.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आजच अर्ज करा.

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना थेट नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची मुलाखत होणार नाहीये. फक्त लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवाराची निवड ही केली जाईल.

हा अर्ज करण्यासाठी काही नियमांचे पालक करावे लागणार आहे. जर त्या नियमांचे पालन हे केले गेले नाही तर तुमचा अर्ज वैध राहणार नाही. यामुळेच अर्ज करताना बारीक गोष्टींवर लक्ष द्या. या भरती प्रक्रियेद्वारे विविध ट्रेडमधील शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 275 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामुळे अर्ज करताना नेमक्या कोणत्या ट्रेडसाठी तुम्ही अर्ज करत आहात हे व्यवस्थितपणे बघा.

मुळात म्हणजे या पदासाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतो. फक्त दहावी पासच नाही तर उमेदवाराकडे आयटीआयची पदवी असणेही आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय किमान 14 असायला हवे. बाकी इतर काही माहितीसाठी तुम्ही अधिसूचना तपासू शकता. अर्ज केल्यानंतर काही महिन्यांमध्ये याची परीक्षा ही घेतली जाईल. परीक्षेसाठी यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 7700 ते रु.8050 पर्यंतचे स्टायपेंड दिले जाईल.

परीक्षेनंतर तुमचे कागदपत्र तपासली जाणार. यामुळेच आजच करा अर्ज आणि मिळवा थेट सरकारी नोकरी. 1 जानेवारी 2024 पर्यंतच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार नाहीत. अर्ज करण्यासाठी एसएससी प्रमाणपत्र, आयटीआय प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र, एनसीसी प्रमाणपत्र आणि क्रीडा प्रमाणपत्र लागणार आहे.

आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.