AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची थेट संधी, दहावी पास असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज, 1100 हून अधिक पदांसाठी..

Indian Railways Recruitment 2024 : रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू असून अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे.

भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची थेट संधी, दहावी पास असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज, 1100 हून अधिक पदांसाठी..
Railways
| Updated on: Jun 16, 2024 | 12:43 PM
Share

अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. रेल्वेत मेगा भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी होत आहे. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

नॉर्थ ईस्टर्न रेल्वे (NER) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ner.indianrailways.gov.in या साईटवर जाऊन इच्छुक उमेदवार आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जुलै 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

ही भरती प्रक्रिया 1104 शिकाऊ पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी पास असावा आणि त्याने 50% गुणांसह दहावी पास केलेली असावी. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये उमेदवाराचा ITI देखील झालेला असावा.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 24 वयोगटापर्यंतचेच उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये फीस ही भरावी लागेल. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावा.

या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला ner.indianrailways.gov.in या साईटवरच मिळेल. अर्ज करताना उमेदवाराने हे व्यवस्थित तपासून घ्यावे की, अर्ज आपण नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जुलै 2024 आहे.

Follow Us
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.
आता म्हणतील अ‍ॅसिड हल्ला झालाच नाही, संजय राऊत यांची जळजळीत टीका
आता म्हणतील अ‍ॅसिड हल्ला झालाच नाही, संजय राऊत यांची जळजळीत टीका.
सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?; शेगावात डिझेल संपलं,....
सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?; शेगावात डिझेल संपलं,.....
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत.
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय.
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार.
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी.
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.