AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Main 2021 Final Answer-Key : जेईई मेन्सची अंतिम उत्तर की जारी, अशी करा डाउनलोड

अंतिम उत्तर की जारी झाल्यानंतर, आता जेईई मेन जुलै 2021 चा निकाल देखील लवकरच जाहीर केला जाईल. अशा परिस्थितीत, असे म्हटले जाऊ शकते की एनटीए(NTA) शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 पर्यंत जेईई मुख्य सत्र -3 चे निकाल 2021(JEE Main Session-3 Result 2021) जाहीर करेल.

JEE Main 2021 Final Answer-Key : जेईई मेन्सची अंतिम उत्तर की जारी, अशी करा डाउनलोड
जेईई मेन्सची अंतिम उत्तर की जारी, येथे करा डाउनलोड
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 11:56 PM
Share

JEE Main 2021 Final Answer Key : जेईई मुख्य सत्र 3(JEE Main Session-3) परीक्षेची अंतिम उत्तर की जारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सी(NTA)ने जारी केलेली उत्तर की डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट- jeemain.nta.nic.in किंवा nta.ac.in ला भेट देणे आवश्यक आहे. जेईई मुख्य सत्र -3 चा निकालही उत्तर कीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. (JEE Main 2021 Final Answer-Key issued, know how to download)

अंतिम उत्तर की जारी झाल्यानंतर, आता जेईई मेन जुलै 2021 चा निकाल देखील लवकरच जाहीर केला जाईल. अशा परिस्थितीत, असे म्हटले जाऊ शकते की एनटीए(NTA) शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 पर्यंत जेईई मुख्य सत्र -3 चे निकाल 2021(JEE Main Session-3 Result 2021) जाहीर करेल. निकाल जाहीर झाल्यानंतर ही लिंक जेईई मेनच्या वेबसाईटवरच सक्रिय केली जाईल. यापूर्वी, एनटीएने तात्पुरती उत्तर की (JEE Mains Provisional Answer Key) जारी केली होती आणि विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्याची परवानगी दिली होती.

उत्तर की डाउनलोड कशी करायची?

– उत्तर की डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट- jeemain.nta.nic.in किंवा nta.ac.in वर जा. – वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर, News & Event वर जा. – यासाठी, वेबसाईटवर दिलेल्या NATIONAL TESTING AGENCY JEE (Main) Session – 3, 2021 FINAL ANSWER KEY लिंकवर क्लिक करा. – आता लॉगिनसाठी विचारलेले तपशील भरा आणि सबमिटवर क्लिक करा. – क्लिक केल्यावर उत्तर की दिसेल. – ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट घ्या. – डायरेक्ट लिंकवरून उत्तर की डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

जेईई मेन्स सत्र – 4

सत्र -3 निकालानंतर, जेईई मुख्य सत्र – 4(JEE Main session 4) ची विंडो ओपन जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केला नाही त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी मिळेल. ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना अर्जात आवश्यक सुधारणा करण्याची संधी मिळेल. NTA लवकरच त्याचे वेळापत्रक जाहीर करेल. ही परीक्षा ऑगस्टमध्ये घेतली जाईल.

एअर रँक

जेईई मुख्य निकाल लवकरच जाहीर केला जाईल. विद्यार्थी अंतिम उत्तर की मध्ये प्रवेश करू शकतात आणि ते किती गुण मिळवतात हे जाणून घेऊ शकतात. सध्या, आणखी एक सत्र अर्थात जेईई मुख्य सत्र 4(JEE Main session 4) आयोजित करणे बाकी आहे. अखिल भारतीय रँकिंग (JEE AIR List 2021) यादी सत्र -3 च्या निकालासह प्रकाशित केली जाणार नाही. NTA चौथ्या सत्राच्या निकालानंतर रँक आणि कट ऑफ जाहीर करेल. (JEE Main 2021 Final Answer-Key issued, know how to download)

इतर बातम्या

‘या’ सरकारी बँकेने कर्जदारांना दिली मोठी खूशखबर; 30 सप्टेंबरपर्यंत शुल्काचा एक रुपयाही भरावा लागणार नाही

मोठी बातमी ! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात 40 अतिरिक्त विशेष ट्रेन, रेल्वे विभागाचा निर्णय

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.